Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

गुन्हेगारांना वडगाव निंबाळकर पोलिसांचा दणका; वेशांतर करून जबरी चोरीतील तर सापळा रचून खुनाच्या प्रयत्नातील फरार आरोपींना ठोकल्या बेड्या

1 0 3 0 1 0

वडगाव निंबाळकर : गंभीर स्वरूपाचे गुन्हे करून पोलिसांच्या हातावर तुरी देत फरार झालेल्या दोन सराईत आरोपींच्या मुसक्या आवळण्यात वडगाव निंबाळकर पोलिसांना मोठे यश आले आहे. जबरी चोरीच्या गुन्ह्यातील एका फरार आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी थेट वेशांतर करून सापळा रचला आणि त्याला अत्यंत शिताफीने जेरबंद केले, तर दुसऱ्या धडक कारवाईत खुनाच्या प्रयत्नातील फरार आरोपीलाही बेड्या ठोकल्या आहेत.

पोलिसांच्या या दमदार कामगिरीमुळे परिसरातील गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.

वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गंभीर गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यातील आरोपी पवन सॅंडल काळे (रा. विडणी, ता. फलटण, जि. सातारा) हा गुन्हा दाखल झाल्यापासूनच पोलिसांना गुंगारा देत फरार होता. त्याला पकडण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. मात्र, वडगाव निंबाळकर पोलिसांनी आपले तपास कौशल्य पणाला लावत विशेष रणनीती आखली. पोलीस पथकाने स्वतःची वेशभूषा बदलून त्याचा माग काढला आणि आरोपीला काही समजण्यापूर्वीच त्याला ताब्यात घेतले.

एवढ्यावरच न थांबता पोलिसांनी दुसऱ्या एका गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपीचाही कसून शोध सुरू केला होता. वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल असलेला आरोपी रवींद्र तात्याबा खामगळ (रा. खामगळवाडी, ता. बारामती, जि. पुणे) हा देखील फरार होता.

पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे त्याचा अचूक ठावठिकाणा शोधून काढत त्यालाही गजाआड केले आहे.

सदरची ही धडाकेबाज कारवाई वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक जीवन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेत पोलीस हवालदार हृदयनाथ देवकर, अनिल खेडकर, संदीप गायकवाड, पोलीस शिपाई विकास येटाळे, सचिन घाडगे, आबा जाधव, नरेंद्र यादव, सूरज धोत्रे, नागनाथ परगे यांनी मोलाची भूमिका बजावली.

गंभीर गुन्ह्यांतील फरार आरोपींना अल्पावधीतच जेरबंद करून वडगाव निंबाळकर पोलिसांनी पुन्हा एकदा आपल्या कार्यतत्परतेची आणि कणखर कायदा-सुव्यवस्थेची चुणूक दाखवून दिली असून, या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे