ब्रेकिंगमहाराष्ट्र
पुणे ग्रामीणमध्ये ३० पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची मोठी कारवाई; वाचा कोणाची कुठे झाली नियुक्ती?
पुणे ग्रामीण पोलीस दलात प्रशासकीय खांदेपालट; ३० पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी

0
7
1
2
5
6
पुणे/बारामती : पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून प्रशासकीय निकड आणि जनहित लक्षात घेऊन पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे महत्त्वपूर्ण आदेश काढण्यात आले आहेत. जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाच्या शिफारशीनुसार आणि मान्यतेनुसार ही कार्यवाही करण्यात आली असून, या अंतर्गत एकूण ३० अधिकाऱ्यांच्या बदल्या व नवीन पदस्थापना करण्यात आल्या आहेत. या सर्व अधिकाऱ्यांना त्यांच्या नवीन नियुक्तीच्या ठिकाणी तात्काळ रुजू होण्याचे निर्देश पोलीस अधीक्षकांकडून देण्यात आले आहेत.

बदली झालेल्या ३० पोलीस अधिकाऱ्यांची सविस्तर यादी खालीलप्रमाणे आहे:
१. पोलीस निरीक्षक दत्तात्रय किसन गुंड – नियंत्रण कक्ष, पुणे ग्रामीण येथून जुन्नर पोलीस ठाणे
२. पोलीस निरीक्षक कुमार रामचंद्र कदम – सासवड पोलीस ठाणे येथून राजगड एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे
३. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर मोहनराव यादव – बारामती तालुका पोलीस ठाणे येथून शिक्रापूर पोलीस ठाणे
४. पोलीस निरीक्षक विनोद भगवान पाटील – नियंत्रण कक्ष, पुणे ग्रामीण येथून शिरूर पोलीस ठाणे
५. पोलीस निरीक्षक सचिन दिनकर पाटील – नियंत्रण कक्ष (चार्ज जिल्हा विशेष शाखा) येथून लोणावळा शहर पोलीस ठाणे
६. पोलीस निरीक्षक राजेश नारायणराव रामभेरे – लोणावळा शहर पोलीस ठाणे येथून हवेली पोलीस ठाणे
७. पोलीस निरीक्षक संतोष वसंत तासगावकर – आर्थिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण येथून यवत पोलीस ठाणे
८. पोलीस निरीक्षक हेमंत गणपत शेडगे – नियंत्रण कक्ष, पुणे ग्रामीण येथून दौंड पोलीस ठाणे
९. पोलीस निरीक्षक विजयमाला महादेव पवार – जिल्हा विशेष शाखा, पुणे ग्रामीण येथून उरुळी कांचन पोलीस ठाणे
१०. पोलीस निरीक्षक संतोष शामराव जाधव – जिल्हा वाहतूक शाखा, पुणे ग्रामीण येथून राजगड पोलीस ठाणे
११. पोलीस निरीक्षक महादेव नारायण वाघमोडे – राजगड एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे येथून आर्थिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण
१२. पोलीस निरीक्षक संदीप अरुण केंजळे – शिरूर पोलीस ठाणे येथून आर्थिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण
१३. पोलीस निरीक्षक वैशाली रावसाहेब पाटील – हवेली पोलीस ठाणे येथून महिला कक्ष/भरोसा सेल, पुणे ग्रामीण
१४. पोलीस निरीक्षक नारायण शिवाजी देशमुख – यवत पोलीस ठाणे येथून एफ.आर.ओ., पुणे ग्रामीण
१५. सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ गुरुनाथ पाटील – वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे येथून नियंत्रण कक्ष, पुणे ग्रामीण

१६. पोलीस निरीक्षक राजेश गणेश गवळी – राजगड पोलीस ठाणे येथून अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभाग, पुणे ग्रामीण
१७. पोलीस निरीक्षक निलेश पांडुरंग माने – वाहतूक शाखा, बारामती विभाग येथून भोर पोलीस ठाणे
१८. पोलीस निरीक्षक संतोष श्रीमंत घाडगे – टी.एस.पी., पुणे ग्रामीण येथून सासवड पोलीस ठाणे
१९. पोलीस निरीक्षक रविंद्र दत्तात्रय पाटील – एफ.आर.ओ., पुणे ग्रामीण येथून जेजुरी पोलीस ठाणे
२०. सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भाऊसाहेब वाघचौरे – जेजुरी पोलीस ठाणे येथून आर्थिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण
२१. पोलीस निरीक्षक नारायण विनायकराव पवार – नियंत्रण कक्ष येथून बारामती तालुका पोलीस ठाणे
२२. सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन शांताराम मोहिते – इंदापूर पोलीस ठाणे येथून वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे
२३. सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ पांडुरंग शेडगे – नियंत्रण कक्ष, पुणे ग्रामीण येथून शिरगाव पोलीस ठाणे
२४. सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप दत्तात्रय संकपाळ – स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण येथून माळेगाव पोलीस ठाणे
२५. पोलीस निरीक्षक महेश नामदेव मेघश्याम – सुरक्षा शाखा, पुणे ग्रामीण येथून सायबर पोलीस ठाणे, पुणे ग्रामीण
२६. पोलीस निरीक्षक गोपाल बाळू पवार – दौंड पोलीस ठाणे येथून जिल्हा वाहतूक शाखा, पुणे ग्रामीण
२७. पोलीस निरीक्षक महेश रामेश्वर स्वामी – नियंत्रण कक्ष, पुणे ग्रामीण येथून वाहतूक शाखा, बारामती विभाग, पुणे ग्रामीण
२८. पोलीस निरीक्षक दिग्विजय गोरख गावकवाड – शिक्रापूर पोलीस ठाणे येथून जिल्हा विशेष शाखा, पुणे ग्रामीण
२९. सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद जगन्नाथ महांगडे – शिरगाव पोलीस ठाणे येथून आर्थिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण
३०. पोलीस निरीक्षक विकास जगन्नाथ भुजबळ – नियंत्रण कक्ष, पुणे ग्रामीण येथून सुरक्षा शाखा, पुणे ग्रामीण




