Breaking
महाराष्ट्रराजकिय

बारामतीत महायुतीच्या विजयाचा ‘शिवसेना’ फुंकणार शंखनाद; सुनेत्रा वहिनींना विक्रमी मताधिक्याने निवडून देण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन

0 6 4 2 9 4

बारामती: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, महायुतीच्या उमेदवार श्रीमती सुनेत्रा अजितदादा पवार यांच्या प्रचारार्थ शिवसेना पुणे जिल्ह्याच्या वतीने ‘विजयी संकल्प मेळावा’ मोठ्या उत्साहात पार पडला. या मेळाव्यात उपस्थित सर्व प्रमुख नेत्यांनी सुनेत्रा वहिनींना ऐतिहासिक मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला.

कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक, राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. डॉ. उदयजी सामंत यांनी आपल्या भाषणात कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरला. यावेळी बोलताना अनेक नेत्यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विकासकामांच्या आणि संघर्षाच्या आठवणींना उजाळा दिला. “बारामतीचा विकास हा अजितदादांच्या नेतृत्वाखाली झाला असून, आता सुनेत्रा वहिनींच्या रूपाने हा वारसा अधिक सक्षमपणे पुढे नेण्याची गरज आहे,” असे मत नेत्यांनी व्यक्त केले. तसेच, गाफील न राहता प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचून सुनेत्रा वहिनींना विक्रमी मताधिक्य मिळवून द्यावे, असे आवाहन उपस्थित मान्यवरांनी केले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री.सुनिल तटकरे यांच्यासह जय दादा पवार उपस्थित होते.

मेळाव्यास उपस्थित प्रमुख नेते मंडळी:

यावेळी व्यासपीठावर पुणे जिल्ह्यासह बारामतीतील अनेक दिग्गज नेते उपस्थित होते, ज्यामध्ये प्रामुख्याने:

पुणे जिल्हा: श्री. चंद्रहार पाटील (माढा लोकसभा प्रमुख), श्री. किरण साळी (सचिव, युवासेना), मा.श्री. दिनकररावजी चव्हाण (माजी आमदार), श्री. अनिकेतराजे नाईक निंबाळकर, श्री. प्रमोद नाना भानगिरे, श्री. रविंद्रभाऊ धंगेकर, श्री. उमरभाई, श्री. रमेश बाबू कोंडेकर आणि आदींचा समावेश होता.

बारामती विभाग: श्री. वसंतराव माने, श्री. मंगेश खताळ, श्री. दिग्विजय जगताप,श्री. हनुमंत देवकाते पाटील आणि श्री. सुशीलकुमार अडागळे यांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

या मेळाव्याने बारामती विधानसभा क्षेत्रात शिवसेनेने प्रचारात मोठी आघाडी घेतल्याचे चित्र पाहायला मिळत असून, महायुतीमधील समन्वय अधिक घट्ट झाल्याचे दिसून आले.

दरम्यान या कार्यक्रमात श्री.विठ्ठलराव देवकाते,धनगर समाजाचे नेते व रासप तालुका अध्यक्ष यांचा शिवसेना पक्षात पक्ष प्रवेश घेण्यात आला.

हा मेळावा शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. सुरेंद्र जेवरे यांच्या आयोजनात शिवसेना पुणे जिल्हा,युवा सेना व सर्व अंगीकृत संघटनांनी यशस्वीपणे पार पाडला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे