Breaking
अपघातब्रेकिंगमहाराष्ट्र

बारामती तालुका पोलिसांची नाकाबंदी आणि सायलेन्सर मोहिमेत ५५ वाहनांवर कारवाई

0 9 0 2 7 0

बारामती: बारामती तालुका पोलीस स्टेशनच्या वतीने वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. आज पेन्सिल चौकात करण्यात आलेली नाकाबंदी आणि कर्कश आवाज करणाऱ्या सायलेन्सरवरील विशेष मोहिमेत एकूण ५५ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून ६३,५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

काल बारामती तालुका पोलिसांनी पेन्सिल चौकात नाकाबंदी करून वाहनांची कसून तपासणी केली. चोरीच्या मोटारसायकलचा शोध घेण्याच्या दृष्टीने वाहनांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. यासोबतच अल्पवयीन मुले वाहने चालवत आहेत का, विनापरवाना (लायसन्स नसताना) वाहन चालवणे, ट्रिपल सीट, फॅन्सी नंबर प्लेट, काळ्या काचा (ब्लॅक फिल्म), विना सीट बेल्ट आणि मद्यपान करून वाहन चालवणे अशा विविध बाबींची तपासणी करण्यात आली. या नाकाबंदी दरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २७ वाहनांवर ई-चलनद्वारे कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून ३५,५०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

कर्कश सायलेन्सरवाल्यांवर विशेष मोहीम
दुसरीकडे, बुलेट आणि स्प्लेंडर सारख्या गाड्यांना मोठे सायलेन्सर बसवून कर्कश आवाज करत फिरणाऱ्यांवर बारामती तालुका पोलिसांनी विशेष मोहीम राबवली. या मोहिमेत एकूण २८ वाहनांवर कारवाई करून २८,००० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सात वाहनांचे सायलेन्सर पोलिसांनी जप्त केले आहेत.

पोलिसांचे आवाहन आणि कडक इशारा
या धडक कारवाईनंतर बारामती तालुका पोलिसांनी वाहनचालकांना आणि नागरिकांना कडक इशारा दिला आहे. मद्यपान करून किंवा भरधाव वेगात वाहन चालवू नये, विनापरवाना किंवा कागदपत्रांशिवाय वाहन रस्त्यावर आणू नये, ट्रिपल सीट प्रवास करू नये, फॅन्सी नंबर प्लेट आणि ब्लॅक फिल्मचा वापर टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, अल्पवयीन मुलांना वाहन चालवायला दिल्यास त्यांच्या पालकांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. यापुढे मोटारसायकलला मॉडिफाईड सायलेन्सर लावून मोठा आवाज करताना कोणी आढळल्यास त्यांच्यावरही कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे