Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

जबरी चोरीतील आरोपी जेरबंद; ‘येरवडा’त रवानगी बारामती शहर पोलिसांची धडक कारवाई: शिवाजी चौक परिसरातील गुन्ह्याचा वेगाने उलगडा

0 5 4 4 2 6

बारामती : शहरातील वर्दळीच्या शिवाजी चौक परिसरात नागरिकाला मारहाण करून जबरी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या मुसक्या आवळण्यात बारामती शहर पोलिसांना मोठे यश आले आहे. पोलिसांनी केलेल्या वेगवान आणि शास्त्रशुद्ध तपासामुळे आरोपी सिद्धार्थ संतोष घाडगे (वय ३१) याला गजाआड करण्यात आले असून, त्याची रवानगी आता थेट येरवडा मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.

दिनांक ०८/०२/२०२६ रोजी बारामतीतील शिवाजी चौक परिसरात एका फिर्यादीस मारहाण करून जबरदस्तीने रोख रक्कम लुटल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात (गुन्हा रजि. क्र. ६३/२०२६, भा.न्या.सं. कलम ३०९(४)) गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली.

गुन्हा दाखल होताच तांत्रिक विश्लेषण, स्थानिक खबऱ्यांचे नेटवर्क आणि सखोल चौकशीच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा माग काढला. या तपासात सिद्धार्थ संतोष घाडगे (रा. सटवाजी नगर, इंदापूर चौक, बारामती) याचा गुन्ह्यात सक्रिय सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली व त्याच्याकडून चोरीतील काही रक्कमही हस्तगत केली.

आरोपीला न्यायालयात हजर केले असता, सुरुवातीला पोलीस कोठडी आणि तपास पूर्ण झाल्यानंतर न्यायालयीन कोठडी (MCR) सुनावण्यात आली. त्यानंतर त्याची रवानगी पुणे येथील येरवडा केंद्रीय कारागृहात करण्यात आली आहे. या कारवाईमुळे गुन्हेगारी वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली असून, कायद्याच्या चौकटीबाहेर कोणीही राहू शकत नाही, हा स्पष्ट संदेश बारामती पोलिसांनी दिला आहे.

ही धडक कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री. संदीप सिंग गिल, अपर पोलीस अधीक्षक श्री. गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

तपास पथकात पोलीस उपनिरीक्षक श्री. रत्नदीप भंडारे, पोलीस हवालदार सुलतान डांगे, अमोल शिंदे, पोलीस शिपाई विशाल चौधर, सागर जामदार, विशाल शिंदे, अक्षय सिताफ आणि नेवसे यांनी मोलाची कामगिरी बजावली.

नागरिकांना आवाहन:

“बारामती शहर पोलीस नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव कटिबद्ध आहेत. परिसरात कोणतीही संशयास्पद हालचाल किंवा गुन्हेगारी कृत्य निदर्शनास आल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा.”

– बारामती शहर पोलीस स्टेशन

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे