चोपडज: दिनांक १ ऑगस्ट २०२६, शनिवार रोजी चोपडज ग्रामपंचायतीच्या वतीने वंचित, शोषित आणि कष्टकरी जनतेचे प्रश्न आपल्या साहित्यातून मांडणारे थोर विचारवंत, साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमाला गावातील नागरिकांनी आणि विविध मान्यवरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या संघर्षमय जीवनावर आणि त्यांनी समाजातील उपेक्षित घटकांसाठी तसेच साहित्याच्या माध्यमातून दिलेल्या अमूल्य योगदानावर प्रकाश टाकण्यात आला. त्यांच्या विचारांचा आणि समतेचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प यावेळी उपस्थितांनी केला.
या जयंती महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला चोपडज ग्रामपंचायतीच्या प्रशासक सौ. मनिषा भोसले, चोपडज गावचे पोलीस पाटील, रवींद्र जगताप, अनिल विठ्ठल गायकवाड, समता परिषदेचे पुणे जिल्हा सरचिटणीस संतोष यादव, अभिजीत नांगरे, हनुमंत जाधव, संतोष ननवरे, लहुजी शक्ती सेना पश्चिम महाराष्ट्र सोशल मीडिया उपप्रमुख सचिन जाधव, अनिल भिसे, किरण मोहिते आणि ग्रामपंचायत लिपिक तुषार शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या सर्व मान्यवरांसह चोपडज गावातील समस्त ग्रामस्थ, युवक आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने या अभिवादन सभेसाठी उपस्थित होते. सर्वांच्या उपस्थितीत आणि डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयघोषात या जयंती कार्यक्रमाची अत्यंत उत्साहात सांगता झाली.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा