Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे बिगुल! शिवसेनेची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न; आरक्षणासह उमेदवारीवर खलबते

0 4 7 3 2 9

बारामती : आगामी काळात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने जोरदार तयारी सुरू केली आहे. या अनुषंगाने आज (दि. १६) सकाळी ११ वाजता कृष्णसागर हॉटेल येथे शिवसेनेची आणि युवासेनेची अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत जिल्हा परिषद गटनिहाय व पंचायत समिती गणनिहाय आरक्षण आणि इच्छुक उमेदवारांची चाचपणी यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब, शिवसेना नेते तथा संपर्कप्रमुख श्री. विजय बापू शिवतारे, शिवसेना उपनेते निलमताई गोऱ्हे आणि महाराष्ट्र राज्य युवासेना सचिव किरण भाऊ साळी यांच्या विशेष आदेशानुसार व मार्गदर्शनाखाली ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीत आगामी निवडणुका कशा प्रकारे लढवायच्या, गट आणि गणनिहाय आरक्षणाची सद्यस्थिती आणि त्यानुसार पक्षाची रणनीती यावर विस्तृत मंथन झाले. तसेच पक्षाकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांची मते जाणून घेण्यात आली आणि त्यांच्या नावांची प्राथमिक चाचपणी करण्यात आली.

या महत्त्वपूर्ण बैठकीसाठी शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष (पुणे) श्री. देवेंद्र बनकर आणि युवासेना जिल्हाध्यक्ष,ॲड,श्री. दिग्विजय जगताप यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना संघटनात्मक बांधणी मजबूत करण्याचे आवाहन केले.

यावेळी स्थानिक नेतृत्वात शिवसेना तालुकाप्रमुख संग्राम चांदगुडे, तालुकाप्रमुख स्वप्निल जगताप, वैद्यकीय मदत कक्ष जिल्हाप्रमुख श्री. मंगेश खताळ, विधानसभा क्षेत्र प्रमुख व सोशल मीडिया प्रमुख श्री. सुशीलकुमार अडागळे, आणि वैद्यकीय मदत कक्ष विधानसभा प्रमुख श्री. हनुमान देवकाते,वैद्यकीय मदत कक्ष शहरप्रमुख कृष्णमूर्ती जगताप हे उपस्थित होते.

या बैठकीसाठी केवळ पदाधिकारीच नव्हे तर शिवसेनेच्या अंगीकृत संघटनांना पदाधिकारी होते. यामध्ये प्रामुख्याने वैद्यकीय मदत कक्ष, भारतीय कामगार सेना, महिला आघाडीच्या पदाधिकारी, युवा सेना आणि शिवसैनिक उपस्थित होते. आगामी निवडणुकांमध्ये शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी सर्वजण सज्ज असल्याचे चित्र या बैठकीतून दिसून आले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे