Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

महिलेवर वारंवार अत्याचार करून पती व मुलाला जीवे मारण्याची धमकी; आरोपीला अटक

1 0 1 3 0 7

बारामती : तालुक्यातील कोऱ्हाळे बुद्रुक येथील थोपटेवाडी परिसरात एका महिलेवर वारंवार अत्याचार करून, तिच्या पतीला आणि मुलाला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या एका नराधमाला वडगाव निंबाळकर पोलिसांनी अटक केली आहे. अक्षय अजित तावरे असे या अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ एप्रिल २०२६ ते ४ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. आरोपी अक्षय तावरे याने थोपटेवाडी येथील दोन वेगवेगळ्या घरांमध्ये पीडित महिलेच्या संमतीशिवाय तिच्यावर वेळोवेळी जबरदस्तीने अत्याचार केले. या भयंकर प्रकाराबाबत कोणाला काहीही सांगितल्यास पती आणि मुलाला जीवे मारण्याची धमकी त्याने दिली. तसेच, शारीरिक संबंधांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने महिलेला गप्प राहण्यास भाग पाडले होते.

अखेर या सततच्या त्रासाला कंटाळून पीडित महिलेने वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनमध्ये धाव घेऊन फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी अक्षय तावरे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ६४(२)(m) आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल करून त्याला तत्काळ बेड्या ठोकल्या आहेत. या गंभीर गुन्ह्याचा पुढील तपास वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी जीवन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अजहर मुलाणी करत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे