अपघातब्रेकिंगमहाराष्ट्र
बारामती,शारदानगर येथे एस,टी,बसच्या धडकेत एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी,अपघातानंतर माळेगावकरांचे आंदोलन.

0
7
9
2
1
8
बारामती : निरा बारामती रोडवर शारदानगर येथे आज सकाळी राज्य परिवहन महामंडळाच्या बसने धडक दिल्याने एका ५९ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला तर या अपघातात त्यांची नात गंभीर जखमी झाली आहे.

राजेंद्र दिनकर भागवत वय ५९ वर्ष राहणार गोखळी ता. फलटण असे मृत व्यक्तीचे नाव असून स्वरा भागवत असे गंभीर जखमी झालेल्या मुलीचे नाव आहे.सकाळी सात वाजण्याच्या सुमारास बारामती निरा रस्त्यावर शारदानगर येथे हा अपघात झाला.
राजेंद्र भागवत हे फलटण मधील जेष्ठ पत्रकार होते असेही सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार राजेंद्र भागवत हे आपल्या नातीला शारदानगर येथे सोडण्यासाठी दुचाकी घेऊन आले होते. त्यावेळी माळेगावकडून शारदानगरकडे वळण घेत असताना बारामतीकडून निरेकडे जात असलेल्या एस टी महामंडळाच्या बसने जोरदार धडक दिली
व या धडकेत राजेंद्र भागवत यांच्या डोक्याला गंभीर जखम झाल्याने त्यांचा मृत्यू झाला तर त्यांची नात स्वरा ही गंभीर जखमी झाली. उपचारासाठी तिला तातडीने बारामतीतील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.
अपघातानंतर शारदानगर तसेच माळेगाव येथील नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत सार्वजनिक बांधकाम विभाग बारामती तसेच एस टी महामंडळाचा निषेध व्यक्त करीत आंदोलन केले,

शारदानगर महाविद्यालयाच्या समोरील निरा बारामती राज्यमार्गावर गतिरोधक बसवण्याविषयी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
आंदोलनादरम्यान माळेगाव पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.




