Breaking
महाराष्ट्र

बारामती तालुक्यातून एकाच दिवशी दोन तरुणी बेपत्ता; पोलिसांत तक्रार दाखल

0 7 5 0 7 7

बारामती : तालुक्यातून गुरुवारी (दि. २५ जून २०२६) एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणांहून दोन तरुणी बेपत्ता झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. रुई आणि काटेवाडी परिसरातून या तरुणी बेपत्ता झाल्या असून, या प्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात हरवल्याची (मिसिंग) नोंद करण्यात आली आहे.
पहिली घटना रुई (ता. बारामती) येथे घडली. आदिती जलेश्वर यादव (वय १८, रा. रुई, मूळ रा. बिलासपूर, छत्तीसगड) असे बेपत्ता झालेल्या तरुणीचे नाव आहे. तिचे वडील जलेश्वर यादव (वय ५०) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. दिलेल्या माहितीनुसार, गुरुवार दि. २५ जून रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास आदिती ही शेजारील सात वर्षांच्या मुलीला (चांदणी) घेऊन घराबाहेर पडली होती. बराच वेळ ती परत न आल्याने शोध घेतला असता, सोबत गेलेली लहान मुलगी महादेव मंदिराजवळ रडताना सापडली. तिने सांगितले की, आदिती तिला तिथे बसवून निघून गेली आहे. बस स्टॉप, रेल्वे स्टेशन, एमआयडीसी परिसर आणि नातेवाईकांकडे शोध घेऊनही आदिती न सापडल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे. आदितीची उंची ४ फूट असून, रंग गोरा, चेहरा उभट आणि केस लांब आहेत. तिने अंगात हलक्या हिरव्या रंगाचा टॉप आणि निळ्या रंगाची लेगिन्स घातली आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार थोरवे अधिक तपास करत आहेत.
दुसरी घटना काटेवाडी परिसरातील घुलेवस्ती येथे घडली. अमृता अशोक शिंदे (लग्नानंतरचे नाव अमृता सौरभ नरूटे, वय २८, रा. घुलेवस्ती, काटेवाडी) असे बेपत्ता झालेल्या तरुणीचे नाव आहे. तिचे वडील अशोक भीमराव शिंदे (वय ६२) यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास अमृता ही सूर्यनगरी एमआयडीसी (बारामती) येथे कॉम्प्युटर क्लासला जाते असे सांगून घरातून बाहेर पडली होती. मात्र ती अद्याप घरी न परतल्याने पोलिसांत धाव घेण्यात आली. तिने गुलाबी रंगाचा सलवार कुर्ता घातला असून, तिची उंची ५ फूट ३ इंच, रंग गोरा आणि बांधा सडपातळ आहे. तिला मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषा अवगत आहेत. याप्रकरणी पोलीस हवालदार देवकाते हे पुढील तपास करत आहेत.
सध्या या दोन्ही घटनांचा तपास बारामती तालुका पोलीस करत असून, या दोघींबद्दल कोणालाही काही माहिती मिळाल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे