आरोग्य व शिक्षणब्रेकिंगमहाराष्ट्र
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव निंबाळकर क्र. १ येथे विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव व नवागतांचे स्वागत उत्साहात, नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात आनंददायी उपक्रमांनी

0
7
2
7
8
6
वडगाव निंबाळकर (ता. बारामती) : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव निंबाळकर क्र. १ येथे नवीन शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या पहिल्या दिवशी ‘शाळापूर्व तयारी मेळावा’ व नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत समारंभ उत्साहात संपन्न झाला. यावेळी इयत्ता पहिलीतील विद्यार्थ्यांसह सर्व नव्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प, पाठ्यपुस्तके, गणवेश, बिस्किटपुडे व गोड स्नेहभोजन देऊन स्वागत करण्यात आले.

प्रवेशोत्सवासाठी विशेष आकर्षण ठरली ती ट्रॅक्टरवरून काढलेली प्रभातफेरी या अनोख्या स्वागतामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. फुगे व औक्षण याद्वारेही नवोदितांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती सदस्य जितेंद्र पवार होते. यावेळी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक अनिलशेठ शहा व बारामती तालुका नाभिक महामंडळाचे अध्यक्ष धीरण पवार यांच्या वतीने विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या. माजी ग्रामपंचायत सदस्य संतोष दरेकर यांनी शाळेला सुंदर सरस्वतीची मूर्ती भेट दिली, तर भाजपा तालुकाध्यक्ष सुनील माने यांनी शाळेला थ्रीडी लाइट ऑटो भेट दिला.




