Breaking
अपघातब्रेकिंगमहाराष्ट्र

बारामती विमानतळावर सराव करताना शिकाऊ विमान घसरले; सुदैवाने जीवितहानी नाही

0 8 2 7 6 5

बारामती: बारामती विमानतळावर रविवारी (९ ऑगस्ट) दुपारी सरावादरम्यान अकॅडमी ऑफ कारवार एव्हिएशनचे एक शिकाऊ विमान धावपट्टीवरून घसरल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून, विमानातील प्रशिक्षक आणि ट्रेनी पायलट दोघेही पूर्णपणे सुखरूप आहेत.


बारामती तालुका पोलीस स्टेशनने दिलेल्या माहितीनुसार, अकॅडमी ऑफ कारवार एव्हिएशनचे सेसना १७२ (CESSNA 172 VT-SEX) हे शिकाऊ विमान आज दुपारी १२.०९ वाजता विमानतळावरील पार्किंगमधून टॅक्सीवे ब्राव्हो येथे आणण्यात आले होते. या विमानात ट्रेनी पायलट अभिजीत बाळासाहेब झुडरे आणि २५ वर्षीय प्रशिक्षक कॅप्टन चिराग शशिकांत डोईफोडे उपस्थित होते. एटीसीची परवानगी मिळाल्यानंतर १२.१४ वाजता त्यांनी धावपट्टी २९ वरून विमानाचे उड्डाण केले. आपत्कालीन परिस्थितीचा सराव (इमर्जन्सी प्रॅक्टिस) करण्यासाठी दुपारी १२.२० वाजता हे विमान पुन्हा त्याच धावपट्टीवर उतरवण्यात आले.
यानंतर, याच सरावासाठी धावपट्टीच्या विरुद्ध दिशेने (रनवे क्रमांक ११) पुन्हा टेकऑफ घेण्यात आले व थोड्याच अंतरावर विमान धावपट्टीवर सुरक्षित लँड करण्यात आले. मात्र, दुपारी १२.२३ वाजता विमान धावपट्टीवर चालवत (टॅक्सींग) असताना धावपट्टीच्या शेवटी नियंत्रण करत असताना ते अचानक सुमारे २० फूट अंतर घसरले. रनवे क्रमांक ११ संपल्यानंतर उजव्या बाजूला असलेल्या गवतामध्ये जाऊन विमान थांबले.

 

या घटनेत विमानाचे काही प्रमाणात किरकोळ नुकसान झाले असल्याचे दिसून आले आहे. परंतु, या प्रकारात प्रशिक्षक आणि ट्रेनी पायलट यांना कोणतीही दुखापत वा इजा झालेली नाही, अशी नोंद पोलिसांत करण्यात आली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे