गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र
स्थानिक गुन्हे शाखा व वडगाव निंबाळकर पोलिसांचे मोठे यश; सराईत गुन्हेगाराला अटक करून लाखो रुपयांचा मुद्देमाल केला हस्तगत.

1
0
1
6
0
3
बारामती : पुणे जिल्ह्यातील वडगाव निंबाळकर व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, पुणे ग्रामीण यांच्या पोलिसांनी संयुक्त कारवाई करत जबरी चोरी करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी २ लाख ३० हजार रुपये किमतीचा सोन्याचा मुद्देमाल जप्त केला आहे.

बारामती तालुक्यातील मौजे लाटे गावच्या हद्दीत घडलेल्या एका जबरी चोरीच्या घटनेबाबत वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा (गु.र.नं. १८०/२०२६ बी.एन.एस. कलम ३११, ३३१(६), ३(५)) दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन मोहिते व पोलीस उपनिरीक्षक अझर मुलाणी यांच्यासह एका विशेष पोलीस पथकाची नेमणूक करण्यात आली होती. या पथकाने घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तसेच तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे तपासाला सुरुवात केली. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी मौजे कांबळेश्वर येथे शोध मोहीम राबवून संशयितांच्या घरांची झडती घेतली आणि घरफोडीसाठी वापरले जाणारे साहित्य जप्त केले. या तपासातून पोलिसांनी गुन्ह्यातील मुख्य आरोपी शक्तिमान अविनाश उर्फ हनम्या काळे (वय २५, रा. माळेगाव खुर्द, सध्या रा. कांबळेश्वर, ता. बारामती) याला अटक केली आहे.




