अहिल्या नगर जिल्हा प्रतिनिधी
देवळाली प्रवरा : नगरपरिषदे मार्फत देवळाली प्रवरा नगरपरिषद हद्दीतील देवळाली प्रवरा व राहुरी फॅक्टरी परिसरात भूमिगत गटाराचे काम केले असून त्यासाठी रस्ते खोदलेले असून रस्त्यांना पडलेले खड्डे बुजवून रस्ते तात्काळ दुरुस्त करा अन्यथा दि.६ जून रोजी देवळाली प्रवरा नगरपरिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा माजी नगरसेवक आदिनाथ कराळे यांनी दिला आहे.

देवळाली प्रवरा नगरपरिषद हद्दीतील भूमिगत गटाराचे उत्खनन केलेल्या रस्त्यांची तत्काळ दुरुस्ती करण्यात यावी.या मागणीसाठी मा.नगरसेवक आदिनाथ कराळे यांनी मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की,देवळाली प्रवरा नगरपरिषदेने भूमिगत गटार करण्यासाठी काढलेल्या निविदे अंतर्गत देवळाली प्रवरा व राहुरी फॅक्टरी परिसरातील भूमिगत गटाराचे काम ठेकेदारामार्फत करण्यात आले.ठेकेदाराने काम करताना निविदेतील अटी व शर्तींचे पालन केले की नाही याची खात्रीही नगरपरिषद प्रशासनाने न करता अर्धवट केलेल्या कामाचे बिल पूर्णपणे अदा करण्यात आले आहे.

देवळाली प्रवरा नगरपरिषद प्रशासनाला वारंवर लेखी व तोंडी सूचना करूनही प्रशासनाकडून अद्यापपर्यंत कुठलीही कारवाई झाली नाही.
निविदेत ज्या रस्त्यांचे उत्खनन केले जातील ते पूर्ववत करण्याची अट नमूद असताना तिचे पालन संबंधित ठेकेदाराने केलेले नाही.रस्त्यावरील खड्डे बुजले नसल्याने नागरिकांची रस्त्यावरून ये जा करताना तारांबळ होताना दिसून येत आहे.तरी देवळाली प्रवरा नगरपरिषद प्रशासनाने त्वरित संबंधित ठेकेदाराकडून ८ दिवसांच्या आत रस्ते पूर्ववत करावे.अन्यथा ६ जून रोजी नगरपरिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा मा.नगरसेवक आदिनाथ कराळे यांनी दिला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा