आरोग्य व शिक्षणगुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र
बारामतीत खळबळ तरुणांच्या जीवाशी खेळणाऱ्या बेकायदेशीर टर्मिन इंजेक्शन रॅकेटवर पोलिसांचा मोठा प्रहार
शंभर इंजेक्शनसह आरोपी जेरबंद औषध विक्रीच्या बेकायदेशीर नेटवर्कचा तपास सुरू

0
6
9
7
4
8
बारामती: बारामती शहर पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांच्या संयुक्त धडक कारवाईत शरीरास गंभीर अपायकारक ठरू शकणाऱ्या शेड्युल एच प्रवर्गातील टर्मिन नावाने ओळखल्या जाणाऱ्या इंजेक्शनचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत एका आरोपीस अटक करण्यात आली असून तरुणांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या प्रवृत्तींना यामुळे मोठा आळा बसला आहे.

दिनांक 23 मे 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीणच्या पथकास गोपनीय माहिती मिळाली होती की बारामती शहर हद्दीतील एमईसीबी कार्यालयाजवळील सर्व्हिस रोड परिसरात एक इसम संशयास्पदरीत्या इंजेक्शनचा साठा घेऊन फिरत आहे. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने संबंधित ठिकाणी सापळा रचला. यावेळी रोडच्या कडेला ॲक्टिव्हा स्कुटी क्रमांक एमएच 42 एडब्ल्यू 9260 वर बसलेला एक तरुण पोलिसांना संशयास्पद स्थितीत दिसून आला.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव गौरव बाळासो जाधव (वय 24 वर्षे, राहणार पवार बंगला जवळ, आमराई, बारामती) असे आहे. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली मात्र अधिक तपासणी केली असता स्कुटीच्या डिकीत एका खाकी बॉक्समध्ये मेफेनटर्माइन सल्फेट (टर्मिन) नावाने ओळखले जाणारे एकूण 100 सिलबंद इंजेक्शन सापडले. हे इंजेक्शन नाप्रोप्रेन कंपनीचे असून त्यावर मार्च 2026 ची उत्पादन तारीख आणि फेब्रुवारी 2029 ची मुदत संपण्याची तारीख नमूद आहे.
या कारवाईत एकूण

औषध निरीक्षकांचा गंभीर इशारा
या कारवाईदरम्यान औषध निरीक्षक श्री. सचिन बुगड यांनी स्पष्ट केले की

या प्रकरणी बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक 203/2026 नुसार भारतीय न्याय संहिता कलम 123, 125, 278 सह औषध व सौंदर्य प्रसाधने अधिनियम 1940 च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




