Breaking
अपघातब्रेकिंगमहाराष्ट्र

बारामतीत वाहतूक शाखेची जोरदार कारवाई; १०३ वाहनांवर कारवाई करत ९१,३०० रुपयांचा दंड वसूल

1 0 2 9 3 4

बारामती : शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी बारामती शहर वाहतूक शाखेच्या वतीने दिनांक २४ नोव्हेंबर २०२६ रोजी तिरंगा सर्कल परिसरात विशेष वाहतूक मोहीम राबवण्यात आली. सकाळी १०:३० ते दुपारी १:३० वाजेपर्यंत राबवण्यात आलेल्या या मोहिमेत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एकूण १०३ वाहनांवर मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करून ९१,३०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

या विशेष मोहिमेदरम्यान विरुद्ध दिशेने वाहन चालवणे, वाहनांच्या काचांना काळी फिल्म लावणे, दुचाकीवर ट्रिपल सीट प्रवास करणे, वाहन चालवण्याचा परवाना नसणे, विना नंबर प्लेट तसेच तुटलेली नंबर प्लेट वापरणे यांसह इतर विविध वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर पोलिसांनी कडक कारवाई केली.

या धडक मोहिमेमुळे बेशिस्त वाहनचालकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.


सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. बारामती वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक महेश स्वामी यांच्या नेतृत्वाखाली श्रेणी पोलीस उपनिरीक्षक सुभाष काळे, सहाय्यक फौजदार महेश माने, मल्हारे, महिला पोलीस हवालदार सुनीता ढेंबरे, दोरके, सविता धुमाळ, पोलीस हवालदार रमेश काळे, पोलीस अंमलदार आकाश कांबळे आणि बऱ्हाणपूर येथील आरसीपी पथकाने ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे