अभिव्यक्तीब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय
पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांवर ‘राष्ट्रवादी’चे वर्चस्व; भाजप दुसऱ्या क्रमांकावर तर महाविकास आघाडीला धक्का!

0
5
3
1
8
6
पुणे/बारामती : पुणे जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील विविध पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणूक २०२६ चे निकाल आज जाहीर झाले असून, संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) जोरदार मुसंडी मारत निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा परिषदेच्या ७३ पैकी ५५ जागा जिंकत एकहाती सत्ता मिळवली आहे, तर भाजपला १० जागांवर समाधान मानावे लागले आहे.

जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचा डंका
(एकूण जागा – ७३)
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) तब्बल ५५ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले आहे. त्याखालोखाल भारतीय जनता पक्षाने (BJP) १० जागा मिळवल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाला ५ जागांवर विजय मिळाला आहे, तर शिवसेना (उबाठा) आणि इतर पक्षांना माफक यशावर समाधान मानावे लागले आहे.
पंचायत समित्यांमध्येही राष्ट्रवादीच ‘दादा’ (एकूण जागा – १४६)
जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांच्या एकूण १४६ जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसने ९० जागा जिंकत पंचायत समित्यांवरही आपला झेंडा फडकवला आहे. भाजपला २८ जागा मिळाल असून, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाला १२ जागा मिळाल्या आहेत. काँग्रेस (INC) आणि अपक्ष उमेदवारांची संख्या नगण्य आहे.
बारामतीमध्ये पुन्हा एकदा ‘अजितदादां’चाच करिश्मा
बारामती पंचायत समितीच्या १२ जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसने १० जागा जिंकत आपले गड अबाधित राखले आहेत, तर २ जागांवर विरोधकांना यश मिळाले आहे. बारामती जिल्हा परिषद गटातही सर्वच्या सर्व ६ जागा राष्ट्रवादीने जिंकल्याचे चित्र दिसत आहे. या निकालाने बारामती हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.
तालुकानिहाय निकालाचे विश्लेषण
इंदापूर: इंदापूरमध्येही राष्ट्रवादीने निर्विवाद वर्चस्व गाजवले आहे.
आंबेगाव: दिलीप वळसे पाटील यांच्या होम ग्राउंडवर राष्ट्रवादीने आपली पकड मजबूत ठेवली आहे.
शिरूर व जुन्नर: येथे राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये काही अंशी चुरस पाहायला मिळाली, मात्र अंतिम कौल राष्ट्रवादीच्या बाजूने लागला आहे.

पुणे जिल्हा हा राज्याच्या राजकारणाचे केंद्रबिंदू मानला जातो. २०२६ च्या या निवडणुकीत मिळालेले यश हे आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेससाठी मोठे बळ देणारे ठरणार आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीला या निकालातून मोठा धडा घ्यावा लागणार असून, भाजपने काही ठिकाणी मुसंडी मारली असली तरी सत्तेपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना आणखी जोर लावावा लागणार आहे.
आकडेवारीचा तपशील (खालील प्रमाणे)






