Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

गोवंशाची अवैध वाहतूक केल्याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल  सुमारे दीड लाख किमतीच्या गायी व एक चारचाकी वाहन जप्त.

0 7 1 2 5 9

बारामती : शहर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र गोवंश वध निबंधन व गोवंश संवर्धन अधिनियम 2015 तसेच प्राण्यांवर क्रूरता प्रतिबंधक अधिनियम 1960 चे नियम मोडून गोवंशाची अवैध वाहतूक व कत्तलीसाठी नेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा रजिस्टर करण्यात आला आहे.

दिनांक 29/11/2025 रोजी सायं. 07:00 वाजण्याच्या सुमारास बजरंग दलाचे अध्यक्ष श्री युवराज पांडुरंग डाळ (वय 41 वर्षे, रा. निरवागज) व सोबत अक्षय शांताराम देवकाते यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, जेजुरी येथून सांगोला दिशेने अवैधरीत्या 4 गोवंश गायी कत्तलीच्या उद्देशाने एका पिकअप वाहनातून (क्र. MH-12-YB-4080) नेल्या जात आहेत.

प्राप्त माहितीवर तात्काळ प्रतिसाद देत बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री चिवडशेट्टी यांनी पो.शि. अक्षय सिताप व पो.शि. गिरीष नेवसे तसेच वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक श्री निलेश माने यांना तत्काळ कारवाईसाठी रवाना केले.

सुमारे 07:30 वाजता ईरा स्कूल, गुणवडी रोड येथे संशयित पिकअप वाहन अडविण्यात आले. तपासणीदरम्यान वाहनात 4 सुदृढ दुभत्या गायी अत्यंत अमानुष व क्रूर पद्धतीने कोंबून ठेवलेल्या अवस्थेत आढळल्या. जनावरांना चारा–पाणी नव्हते तसेच वाहतुकीसाठी कोणताही विधिसम्मत परवाना चालकाकडे आढळला नाही.

वाहन चालक सलमान ईमानदार (रा. कोळविरे, ता. पुरंदर) व सोबतचा क्लिनर चंद्रकांत बरडे (रा. जेजुरी) यांनी साक्षीदारांसमक्ष कबुल केले की, सदर 4 गायी सांगोला, जि. सोलापूर येथे कत्तलीसाठी पोहोचविण्यासाठी दलाल दत्ता पवार यांनी ₹7000/- भाड्यावर पाठविले होते.

पोलीसांनी गायी तात्काळ पोलीस स्टेशन येथे आणून पाणी दिले व त्यानंतर सुरक्षिततेकरिता हंबिरराव मोहिते गोशाळा, झेंडेवाडी/सासवड, जि. पुणे येथे जमा करण्यात आले. गायींची अंदाजे एकूण किंमत ₹1,45,000/- आहे. पिकअप वाहन देखील जप्त करण्यात आले आहे.

 

सदर प्रकरणात खालील कलमानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे 

महाराष्ट्र गोवंश वध निबंधन व गोवंश संवर्धन अधिनियम 2015 : कलम 5, 5 A, 9, 11

प्राण्यांवर क्रूरता प्रतिबंधक अधिनियम 1960 : कलम 11(1)(a)(b)(m)(e)(h)

मोटार वाहन अधिनियम : कलम 66, 192, 125E

भारतीय न्याय संहिता : कलम 291, 3(5)

प्रकरणातील मुख्य आरोपी – चालक, क्लिनर, दलाल दत्ता पवार व गायी विकणारे शेतकरी यांच्याविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई सुरू आहे.

पुणे पोलीस अधीक्षक यांनी निर्देश जारी केले असून, गोवंशाची अवैध कत्तल संघटित पद्धतीने करणाऱ्यांविरुद्ध बीएनएस कायदा कलम 111 नुसार ‘संघटित गुन्हा’ नोंदविण्याचे आदेश दिले आहेत, जेणेकरून अशा गुन्ह्यांवर कडक वचक निर्माण होईल.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री गिल्ल,अपर पोलीस अधीक्षक श्री रमेश चोपडे, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री गणेश बिरादार,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली

बारामती शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री चिवडशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

अधिकचा तपास पोलीस उपनिरीक्षक श्री,अशोक राऊत करीत आहेत.

बारामती शहर पोलिसांकडून नागरिकांना आवाहन

गोवंशाचे अवैध वाहतूक, विक्री व कत्तल ही कायद्याने दंडनीय असून, गोवंश तस्करीविरुद्ध चालू असलेली मोहीम अधिक प्रभावी करण्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा असून, अशा स्वरूपाची काही माहिती प्राप्त झाल्यास त्वरित पोलीस निरीक्षक बारामती शहर पोलीस ठाणे यांना कळवावी असे 

बारामती शहर पोलीस ठाण्याच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे