गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्रसोशल मिडिया
नग्न व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन लाखभर रुपये उकळले, वडगांव निंबाळकर पोलीसांनी दोघांना ठोकल्या बेड्या

0
6
4
8
8
7

बारामती : महिलेच्या नावाने समाज माध्यमांवर (फेसबुक/इन्स्टाग्राम) वर बनावट खाते तयार करून बारामती तालुक्यातील एका शिक्षकाला मैत्री करण्याच्या उद्देशाने विनंती पाठवून त्यानंतर ओळख वाढवून त्यांच्याशी अश्लील भाषेत संभाषण करत अश्लील फोटो व व्हिडिओ शेअर करता करता शिक्षकाचे नग्न व्हिडिओ बनवून शेअर करण्यास सांगितले. व त्या शिक्षकाने नग्न व्हिडिओ पाठवल्यानंतर नग्न व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्यांचेकडून सुरवातीला 15 हजार, त्यानंतर 30 हजार, 70 हजार अशी वेळोवेळी व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत एकूण 1 लाख 15 हजार रुपये खंडणी उकळली.

दरम्यान बनावट खातेधारकांनी शिक्षकास पुन्हा एक लाख रुपयांची मागणी केली, शिक्षकाने मी तुम्हाला प्रत्यक्ष भेटून पैसे देतो असे सांगून त्यांना वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बोलावून घेतले व घडल्या प्रकाराचा मनस्ताप झाल्याने शिक्षकाने पोलीस स्टेशन गाठले व पोलिसांना या घटनेची माहिती दिली,
पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून सापळा रचून दोन आरोपींना ताब्यात घेतले,आरोपींची अधिक चौकशी केली असता एकाचे नाव अभिषेक विठ्ठलराव पांचाळ वय 24 राहणार नवी आबादी देगलूर रोड, उदगीर तालुका उदगीर जिल्हा लातूर आणि दुसरा आरोपी सिद्धांत महादेव गगनयेडे वय 25 राहणार पाटोदा बुद्रुक तालुका जळकोट जिल्हा लातूर येथील असल्याचे समोर आले.
या बाबत वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं 214/2025 मध्ये विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली त्यांनी हा गुन्हा करताना वापरलेले मोबाईल, मोटरसायकल जप्त करण्यात आले आहे.
गुन्ह्याचा पुढिल तपास वडगांव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक, श्री.नागनाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक, श्री.राहुल साबळे हे करीत आहेत.

“या घटनेच्या अनुषंगाने एक प्रश्न उपस्थित होत आहे की एका प्रतिष्ठित पेशात कार्यरत असणाऱ्या व्यक्तीने अशा गोष्टींना खतपाणी घालणे कितपत योग्य आहे,
अशा मानसिकतेच्या शिक्षकावर कारवाई का करण्यात येऊ नये ? असे समाजातून बोलले जात आहे”पुढे जाऊन अशा व्यक्तीच्या हातून कोणताही अनुचित प्रकार होऊ शकतो हि शक्यता नाकारता येत नाही ?अशा शिक्षकावर कारवाई होणार का ?




