अभिव्यक्तीआरोग्य व शिक्षणब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक
आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक जयंतीनिमित्त वडगाव निंबाळकर येथे हस्ताक्षर स्पर्धा उत्साहात संपन्न; अधिकाऱ्यांनी जागवल्या शालेय आठवणी

0
8
9
3
5
7
वडगाव निंबाळकर :आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या २३५व्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना रुजविण्यासह त्यांच्या लेखनकौशल्याला व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने आद्य क्रांतिवीर उमाजी राजे प्रतिष्ठानच्या वतीने स्वातंत्र्य विद्या मंदिर, वडगाव निंबाळकर येथे सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाची सुरुवात आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक आणि माता सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सकाळ वृत्त समूहाचे पत्रकार चिंतामणी शिरसागर यांनी केले. यानंतर सर्व निमंत्रित पाहुण्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला.

या विशेष कार्यक्रमासाठी सातारा जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व वडगाव निंबाळकरचे सुपुत्र विश्वजीत घोडके, वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी जीवन मोहिते आणि लोणंद पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी जायपत्रे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी मार्गदर्शन करताना उपस्थित श्री . विश्वजीत घोडके यांनी त्यांच्या शालेय जीवनातील जुन्या आठवणींना उजाळा दिला. शाळेतील शिक्षकांची कडक शिस्त आणि त्यांच्या संस्कारांमुळेच आपण घडलो आणि आज या उच्च पदावर पोहोचू शकलो, अशी कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली. आजच्या विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाचा अतिवापर टाळावा आणि अभ्यासात सातत्य ठेवून एक आदर्श अधिकारी व ‘चांगला माणूस’ बनण्याचे ध्येय ठेवावे, असा मोलाचा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. वडगाव निंबाळकरचे प्रभारी अधिकारी जीवन मोहिते यांनी सांगितले की, याच शाळेतून शिक्षण घेऊन मोठे झालेले घोडके साहेब आणि जायपत्रे साहेब हे विद्यार्थ्यांसाठी खरे आदर्श आहेत, त्यांच्याकडून विद्यार्थ्यांनी प्रेरणा व मार्गदर्शन घ्यावे.

या कार्यक्रमास उद्योजक नागेशशेठ घोडके, राजेंद्र शिंदे, कामगार संघटना प्रतिनिधी रिजवान पठाण, सामाजिक कार्यकर्ते, परिसरातील पत्रकार बंधू तसेच ग्रामस्थ आणि स्वातंत्र्य विद्या मंदिराचे सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


स्पर्धेत विविध इयत्तांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेत सुंदर, सुवाच्य आणि आकर्षक अक्षरातून आपले लेखनकौशल्य सादर केले. या सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे:
इयत्ता ५ वी :
प्रथम क्रमांक : कार्तिकी अजित आगम
द्वितीय क्रमांक : स्वराजली वैभव साळवे
इयत्ता ६ वी :
प्रथम क्रमांक : आर्या चंद्रकांत रोंगाळे
द्वितीय क्रमांक : करण हरिभाऊ यादव
इयत्ता ७ वी :
प्रथम क्रमांक : पूर्वा गणेश साळवे
द्वितीय क्रमांक : जानकी गणेश भोसले
इयत्ता ८ वी :
प्रथम क्रमांक : आरती दत्तात्रय पवार
द्वितीय क्रमांक : आकांक्षा रविंद्र भंडलकर
इयत्ता ९ वी :
प्रथम क्रमांक : शिवानी गणेश शिंदे
द्वितीय क्रमांक : सानिका रणजित खोमणे
इयत्ता १० वी :
प्रथम क्रमांक : साजिद समीर बागवान
द्वितीय क्रमांक : अर्चना हनुमंत कांबळे

स्पर्धेत यश संपादन केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. आद्य क्रांतिवीर उमाजी राजे प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल स्वातंत्र्य विद्या मंदिराचे प्राचार्य हेमंत तांबे यांनी आयोजकांचे विशेष आभार मानले. तसेच, कार्यक्रमाला उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्याबद्दल प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुनील खोमणे यांनी सर्व अधिकारी व मान्यवरांचे आभार व्यक्त केले.




