अभिव्यक्तीब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय
बारामती विधानसभा पोटनिवडणूक: सुनेत्राताई पवार यांच्या प्रचार सभेचा वडगाव निंबाळकरमधून जोरदार शुभारंभ.
उन्हाळ्याच्या आव्हानावर मात करत प्रचंड बहुमताने विजय मिळवण्याचा कार्यकर्त्यांचा निर्धार; ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिर परिसरात नारळ फोडून प्रचाराला सुरुवात.

0
6
2
8
9
8
वडगाव निंबाळकर : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीला आता खऱ्या अर्थाने वेग आला असून, महायुतीच्या अधिकृत उमेदवार श्रीमती सुनेत्राताई अजित पवार यांच्या प्रचार सभेचा शानदार शुभारंभ वडगाव निंबाळकर येथे करण्यात आला. ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिर परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीच्या विविध मान्यवरांच्या हस्ते नारळ फोडून या प्रचार मोहिमेचा श्रीगणेशा करण्यात आला. यावेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला.

या प्रचार शुभारंभासाठी वडगाव निंबाळकर परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह महायुतीतील घटक पक्षांचे पदाधिकारी,ग्रामस्थ आणि विशेषतः महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

या कार्यक्रमाला परिसरातील अनेक आजी-माजी पदाधिकारी आणि प्रमुख नेत्यांनी हजेरी लावली. यामध्ये प्रामुख्याने खालील मान्यवरांचा समावेश होता:
माजी सरपंच व प्रशासक: श्री.सुनील ढोले
माजी उपसरपंच (वडगाव निंबाळकर) सौ. संगीता शहा
पंचायत समिती सदस्य: श्री. जितेंद्र पवार
सोमेश्वर सहकारी कारखाना संचालक: शिवाजीराजे राजेनिंबाळकर
माजी सभापती (पंचायत समिती): अविनाश बाबा शिंदे देशमुख
भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष: श्री. सुनील माने
बारामती विधानसभा सोशल मीडिया प्रमुख शिवसेना पक्षाचे: श्री.सुशीलकुमार अडागळे
सोमेश्वर कारखान्याचे माजी संचालक: श्री.अनिल कुमार शहा
माजी सरपंच व विद्यमान सदस्य: श्री. संजय साळवे
इतर प्रमुख उपस्थितीत उद्योजक मारुती नाना पानसरे, श्री. रवींद्र पवार, गजानन गुळूमकर, श्री. सत्येनराजे निंबाळकर, श्री. मधुकर शिंदे, श्री. रामचंद खंडाळे,श्री. दत्तात्रेय खोमणे, ऋषिकेश भैया शिंदे, श्री. नानासाहेब मदने,श्री. उन्मेष शिंदे आणि श्री. राजेंद्र शहा, निलेश आगम,यांच्यासह विविध सेलचे प्रमुख आणि पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.





