Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

बारामतीत हजरत चांदशाहवली दर्गाह मस्जिद मैदानावर भव्य धार्मिक कार्यक्रम संपन्न; २ ते अडीच हजार भाविकांची उपस्थिती!

0 9 3 1 7 5

बारामती: बारामती येथील ऐतिहासिक आणि पवित्र हजरत चांदशाहवली दर्गाह मस्जिद मैदान येथे आयोजित करण्यात आलेला भव्य धार्मिक कार्यक्रम अत्यंत उत्साहात, शांततेत आणि रूहानी व दीनी वातावरणात यशस्वीरित्या संपन्न झाला.

या कार्यक्रमाला पुणे जिल्ह्यातील सुमारे २ ते अडीच हजार मुस्लिम बांधव आणि महिला भगिनींनी (मस्तुरात) मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती.गौस पाक यांच्या जीवनकार्यावर प्रकाशकार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे हजरत मौलाना अतिक अहमद साहेब यांनी आपल्या ओघवत्या शैलीत हजरत अब्दुल कादीर जिलानी (गौस पाक) यांच्या जीवनकार्यावर आणि त्यांच्या शिकवणीवर सविस्तर प्रकाश टाकला. त्यांचे विचार ऐकून उपस्थित जनसमुदाय भारावून गेला. यानंतर मौलाना अमीर रजा कादरी यांनी गौस पाक यांच्या पवित्र स्मृती प्रत्यर्थ सुमधुर ‘नात’ सादर करत संपूर्ण जनसमुदायाला मंत्रमुग्ध केले. तसेच मौलाना अमीन वेळापूरकर यांनी सुंदर कलाम वाचले. कार्यक्रमात उपस्थित हाफीज मुख्तार साहब यांच्यासह असंख्य मौलाना व उलेमा-ए-किराम यांनी वेगवेगळ्या धार्मिक विषयांवर अभ्यासपूर्ण बयान (प्रवचन) केले. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे लहान मुलांनी अत्यंत गोड आवाजात ‘नात शरीफ’ सादर करून सर्वांची मने जिंकली.

कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मा. डीवायएसपी मनीषा ओमासे मॅडम (DYSP Manisha Omase) यांनी स्वतः कार्यक्रम स्थळाला भेट देऊन पाहणी केली. पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कमिटीच्या वतीने पोलीस अधिकारी आणि प्रशासनाचे जाहीर आभार मानण्यात आले.

महिला भाविकांसाठी (मस्तुरात) कार्यक्रमाच्या ठिकाणी बसण्याची आणि पडद्याची अत्यंत स्वतंत्र व उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली होती. सर्व धार्मिक विधी आणि बयानांची सांगता झाल्यानंतर उपस्थित सर्व २ ते अडीच हजार अकीदतमंद (भाविकां) साठी गौसिया कमिटीच्या वतीने लंगर-ए-आम (नियाज/जेवण) चे अतिशय नेटके आणि शिस्तबद्ध आयोजन करण्यात आले होते.आयोजकांचे अविरत परिश्रमहा भव्य कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अजहर युनूस शेख (संपादक, बारामती युथ न्यूजपेपर), आफ्रोज भाई मुजावर, शमशुद्दीन (पप्पू भाई) शेख, Adv रियाज खान,अय्याज शेख, रिजवान मुजावर, हैदर सय्यद, शाहनूर भाऊसाहेब शेख, रजा शेख, वसीम सय्यद, आमीन पठाण, शफातुल्ला मन्सूरी, निजाम पेंटर, फैय्याज रज्जाक भाई, शेख सुब्हान कुरेशी वसीम कुरेशी, शरफुद्दीन कुरेशी, अबु भाई, ईन्नुस मुजावर, हयातुल्ला मन्सूरी, हसन शेख, रमजान शेख, फिरोज सय्यद, अरबाज पठाण, सोनू मुजावर, मंसुर शेख इम्रान पठाण सलमान शेख मुस्तफा शेख अरशान शेख अली शेख हैदर शेख आणि गौसपाक कमिटीच्या सर्व सहकाऱ्यांनी अहोरात्र कष्ट घेऊन परिश्रम घेतले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे