Breaking
अभिव्यक्तीआरोग्य व शिक्षणब्रेकिंगमहाराष्ट्रसकारात्मक बातमी

जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांनी वाढवला गावाचा लौकिक!  गुणवंत आणि ग्लोबल पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा भव्य गौरव सोहळा उत्साहात संपन्न. शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने आदर्श शिक्षकांचा गुणगौरव.

0 9 0 4 0 6

बारामती : वडगाव निंबाळकर येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील शिक्षकांना नुकताच पंचायत समिती बारामतीच्या वतीने ‘गुणवंत आदर्श शिक्षक’ आणि ‘ग्लोबल पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. या गौरवास्पद यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती वडगाव निंबाळकर क्र. १ व २ यांच्या संयुक्त विद्यमाने या कर्तृत्ववान शिक्षकांचा विशेष गुणगौरव समारंभ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव निंबाळकर क्र. २ येथे अत्यंत उत्साहात पार पडला.


या शानदार सोहळ्यामध्ये बारामती तालुका आदर्श गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित झालेल्या 

सौ.कविता राजेंद्र जाधव (आदर्श शिक्षिका, शाळा वडगाव क्र.२), 

सौ.शितल अभिजित हिरवे (आदर्श ग्लोबल शिक्षिका, शाळा वाबळेवस्ती), 

सौ.राणी लक्ष्मण ताकवले (आदर्श गुणवंत शिक्षिका, वडगाव क्र.२) आणि 

श्री.अनिल विलास गवळी (ग्लोबल गुरुजी, वडगाव क्र.१) 

या शिक्षकांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

 

जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांनी आपल्या उत्कृष्ट कामाच्या आणि समर्पणाच्या जोरावर हे मानाचे पुरस्कार प्राप्त केल्याने ही संपूर्ण गावाच्या दृष्टीने अत्यंत अभिमानाची बाब असल्याची भावना यावेळी सर्वांनी व्यक्त केली. विशेषतः वडगाव क्र.१ शाळेचे उपक्रमशील शिक्षक अनिल गवळी व वाबळेवस्ती शाळेतील कर्तव्यदक्ष शिक्षिका शितल हिरवे यांना मिळालेल्या ग्लोबल टीचर पुरस्कारामुळे या सोहळ्याला एक वेगळेच आणि प्रेरणादायी महत्त्व प्राप्त झाले होते.

​या कौतुकास्पद सोहळ्याला वडगाव निंबाळकरच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष स्वप्नील शिंदे,शाळा नंबर १,स्वाती खोडके,शाळा नंबर २, उपाध्यक्ष महेश राऊत, दिपाली मदने, तसेच सदस्य मंगेश खोमणे, दत्तात्रय नेवसे, पिंटू किर्वे, समीर आतार, गणेश शिंदे, मोनिका खोमणे, मोहिनी दीक्षित, प्रियांका महामुनी, शुभांगी साळवे, स्वाती कुंभार, महानंदा गाढवे, वर्षा पवार, सुषमा गायकवाड उपस्थित होते.

मुख्याध्यापिका अरुणा आगम, विजया दगडे, उपशिक्षिका सुलोचना कोळी, मालन बोडरे, सुनीता पवार, लता लोणकर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.

​याप्रसंगी सत्कारमूर्ती शिक्षक अनिल गवळी यांनी ग्रामीण शेतकरी जीवनावर आधारित ‘काट्याकुट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता’ ही हृदयस्पर्शी कविता सादर करून उपस्थित सर्वांची मने जिंकली.

तसेच मंगेश खोमणे, अरुणा आगम, कविता जाधव, राणी ताकवले आणि शितल हिरवे यांनीही आपले मनोगत व्यक्त करत या यशाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

 

​या सुंदर आणि सकारात्मक ऊर्जा देणाऱ्या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन सुनीता पवार यांनी केले, तर उपस्थित सर्व मान्यवर आणि ग्रामस्थांचे आभार मंगेश खोमणे यांनी मानले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे