Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

वासना, हत्या आणि चोरी!  गरोदर महिलेचा जीव घेणारा नराधम पोलिसांच्या जाळ्यात. अवघ्या दोन तासांत लावला छडा!  माळेगाव पोलिसांची मोठी कामगिरी.

0 8 9 9 0 3

बारामती: बारामती तालुक्यातील पणदरे येथील एम.आय.डी.सी परिसरात एका महिलेचा अज्ञात शस्राचा वापर करून तिचा निर्घृण खून करण्यात आल्याची अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना १२ सप्टेंबर २०२६ रोजी उघडकीस आली होती. या घटनेची माहिती मिळताच माळेगाव पोलिसांनी अत्यंत वेगाने आणि कौशल्याने तपास करत अवघ्या दोन तासांत या गुन्ह्याचा छडा लावून आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. माळेगाव पोलिसांच्या या दमदार कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, माळेगाव पोलीस ठाण्यात १३ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. रंजना लक्ष्मण पवार (रा. पणदरे, ता. बारामती) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली होती. त्यांचा मुलगा तानाजी आणि सून वैशाली हे पणदरे एमआयडीसी परिसरात स्वतंत्र राहत होते. १२ सप्टेंबर रोजी सायंकाळी पावणेआठ वाजण्याच्या सुमारास तानाजी रडत असल्याचे शेजाऱ्यांनी रंजना पवार यांना फोनवरून सांगितले. त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असता, सून वैशाली रक्ताच्या थारोळ्यात मयत अवस्थेत पडलेली दिसली.

या भयानक घटनेची माहिती मिळताच माळेगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी अवस्थेतील वैशाली यांना बारामती येथील वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आले. घटनास्थळाची आणि आजूबाजूच्या परिसराची बारकाईने पाहणी करत पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. यावेळी केलेल्या गोपनीय चौकशीत परिसरातील गणेश रामचंद्र माने (वय २६ वर्षे, रा. पणदरे, ता. बारामती) याच्यावर पोलिसांचा संशय बळावला.

पोलिसांनी गणेश माने याला ताब्यात घेऊन त्याची कसून आणि कौशल्यपूर्ण चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची धक्कादायक कबुली दिली. शारीरिक संबंध ठेवण्याच्या उद्देशाने त्याने वैशाली यांना सुरुवातीला हातोड्याने मारून गंभीर जखमी केले. त्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जखमी अवस्थेतच त्यांच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. या अमानुष कृत्याला विरोध करत असताना आणि तिने हे कृत्य कोणाला सांगू नये, या भीतीने त्याने टॉवेलच्या साहाय्याने गळा आवळून वैशाली यांचा निर्घृण खून केला.पोलिसांनी त्याला तातडीने अटक केली असून, त्याला १६ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

या गुन्ह्याचे गांभीर्य आणि क्रौर्य एवढ्यावरच थांबले नाही. तपासादरम्यान फिर्यादी यांनी मयत वैशाली यांच्या गळ्यातील सोन्याचे डोरले आणि पायातील पैंजण चोरीला गेल्याचे पोलिसांना सांगितले. तसेच, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या शवविच्छेदन अहवालात एक अत्यंत हृदयद्रावक बाब समोर आली की, मयत महिला ही गरोदर होती. तिच्या डोक्यावर, मानेवर आणि गुप्तांगावर गंभीर जखमा असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्रात स्पष्ट झाले.

या नव्या आणि गंभीर पुराव्यांनंतर पोलिसांनी अटक आरोपी गणेश माने याच्याकडे अधिक सखोल तपास केला. या तपासात त्याने गुन्ह्यात वापरलेला हातोडा, गुन्हा करताना अंगावर असलेले रक्ताचे कपडे आणि लपवून ठेवलेले चोरीचे दागिने (सोन्याचे डोरले व पैंजण) पोलिसांना काढून दिले. या सर्व धक्कादायक तपासावरून पोलिसांनी या गुन्ह्यामध्ये योग्य ती वाढीव कलमे लावली आहेत.

ही दमदार आणि धडक कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, माळेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ, पोलीस उपनिरीक्षक देवीदास साळवे, अनिल ओमासे, संजय मोहिते, पोलीस हवालदार महेश पटारे, विजय वाघमोडे, अजय अवघडे, विष्णू गायकवाड, सोफिया शेख, तसेच पोलीस अंमलदार अमोल कोकरे, अजिंक्य कदम, श्रीकांत माने, ज्ञानेश्वर मोरे, अमोल वाघमारे, विकास राखुंडे, जयसिंग कचरे, राजू शिंदे, सागर पवार आणि स्थानिक गुन्हे शाखेचे सुलतान डांगे या पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी केली. या गंभीर प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ हे करत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे