गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र
बारामतीतील थरार: पतीला जिवंत गाडण्यासाठी घरातच बांधली कबर, पत्नीचा भयंकर कट उघड

0
8
2
3
6
6
बारामती : शहरात एका सस्पेन्स थ्रिलर चित्रपटालाही लाजवेल अशी अत्यंत धक्कादायक आणि हादरवून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. स्वतःच्याच घरात, स्वतःच्याच पतीला जिवंत गाडण्यासाठी एका पत्नीने गॅलरीत चक्क कबर बांधल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे. सुदैवाने या कटाचा पर्दाफाश झाला असून पोलिसांनी आरोपी पत्नीला बेड्या ठोकल्या आहेत.
जामदार रोडवरील इंद्रप्रस्थ सोसायटीच्या फ्लॅट नंबर ०९ मध्ये हा सर्व थरार रंगला. याप्रकरणी ७१ वर्षीय प्रकाश कान्होबा जगताप यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, त्यांचा ४१ वर्षीय मुलगा प्रविण जगताप याची पत्नी शर्मिला (वय ३८) हिने त्याला कायमचे संपवण्याचा कट रचला होता.
३० जुलै रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास या भयंकर कटाची सुरुवात झाली. शर्मिलाने प्रविणला कोणतेतरी गुंगीचे औषध दिले. औषधाच्या प्रभावाने प्रविण अर्धवट बेशुद्ध अवस्थेत गेल्यावर तिने त्याच्यावर बॅटने अमानुष मारहाण केली. पण तिचा हेतू फक्त मारहाण करण्याचा नव्हता, तर त्याची कायमची विल्हेवाट लावण्याचा होता.
यापुढील घटनाक्रम एखाद्या क्राईम थ्रिलरपेक्षा कमी नाही.




