अभिव्यक्तीब्रेकिंगमहाराष्ट्रसकारात्मक बातमीसामाजिक
वडगाव निंबाळकर येथे श्री छत्रपती जाणता राजा युवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; २२० दात्यांनी केले रक्तदान

0
5
5
5
3
3
वडगाव निंबाळकर : शिवजयंतीचे औचित्य साधून आणि दिवंगत नेते अजितदादा पवार यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यासाठी वडगाव निंबाळकर (ता. बारामती) येथे भव्य ‘महा रक्तदान शिबिराचे’ आयोजन करण्यात आले होते. श्री छत्रपती जाणता राजा युवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित या शिबिरात तब्बल २२० रक्तदात्यांनी सहभाग नोंदवत सामाजिक बांधिलकी जपली.

नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य जितेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर पार पडले. स्थानिक प्राथमिक आरोग्य उपकेंद्र इमारतीसमोर झालेल्या या उपक्रमाची सुरुवात दिवंगत अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व श्रद्धांजली वाहून करण्यात आली. विशेष म्हणजे, या शिबिराचे हे २० वे वर्ष होते.





