Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

बारामतीत ६० ते ६५ वर्षीय अनोळखी वृद्धाचा मृतदेह आढळला; ओळख पटविण्याचे पोलिसांचे आवाहन

0 8 6 4 8 1

​बारामती : बारामती शहरातील नेवसे रोड, भिगवण चौक परिसरात एका ६० ते ६५ वर्षीय अनोळखी वृद्धाचा मृतदेह आढळून आला आहे. या मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नसून, त्यांची ओळख पटविण्यासाठी बारामती शहर पोलिसांनी नागरिकांना सहकार्याचे आवाहन केले आहे.

​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अनोळखी इसमाचा मृतदेह मिळून आला असून तो सध्या बारामती येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या शवागृहात सुरक्षित ठेवण्यात आला आहे. मयत व्यक्तीची अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

मयत इसमाचे वर्णन:

वय: अंदाजे ६० ते ६५ वर्षे

पोशाख: अंगात पूर्ण बाह्यांचा पांढऱ्या रंगाचा शर्ट, आत पांढऱ्या रंगाचे बनियान आणि कमरेला पांढऱ्या रंगाचा पायजमा.

इतर खुणा: गळ्यात केशरी रंगाचा गमछा तसेच तुळशीची माळ घातलेली आहे.

पोलिसांचे आवाहन

वरील वर्णनावरून या मृत व्यक्तीची ओळख पटल्यास, त्यांचे नाव, पत्ता किंवा त्यांच्या नातेवाईकांबद्दल कोणतीही माहिती असल्यास नागरिकांनी तात्काळ बारामती शहर पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. तसेच, ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावी जेणेकरून मृताच्या नातेवाईकांचा शोध घेणे सोपे होईल, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

संपर्कासाठी क्रमांक:

बारामती शहर पोलीस ठाणे: ९५५२०६९१००

पोलीस निरीक्षक श्री.चिवडशेट्टी: ८१०८२२२०६८

पोलीस हवालदार खाडे: ९८८१३२७६६१

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे