Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्रसोशल मिडिया

सावधान! १.३० कोटींची सायबर फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली लूट!  बारामती पोलिसांची वेगवान कारवाई,  ४४ लाख रुपये वाचवले; दोन आरोपी गजाआड!

0 6 1 5 8 3

बारामती: शेअर मार्केट आणि आयपीओ (IPO) मध्ये गुंतवणूक करून भरघोस परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका व्यक्तीची तब्बल १ कोटी ३० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार बारामतीत उघडकीस आला आहे. या गंभीर सायबर गुन्ह्यात बारामती शहर पोलिसांनी अत्यंत वेगाने आणि तांत्रिकदृष्ट्या प्रभावी तपास करत तब्बल ४४ लाख रुपये विविध बँक खात्यांमध्ये गोठवण्यात (Freeze) मोठे यश मिळवले आहे. या प्रकरणी आतापर्यंत दोन संशयित आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.

तपासात निष्पन्न झालेल्या माहितीनुसार, ही फसवणूक अत्यंत नियोजनबद्ध आणि संघटित सायबर रॅकेटमार्फत करण्यात आली,

सुरुवातीला फिर्यादी यांना “F24 Indian Stock Market Investors Discussion Group” नावाच्या एका अनोळखी WhatsApp ग्रुपमध्ये सामावून घेण्यात आले.

विश्वास संपादन केल्यानंतर त्यांना लिंक पाठवून ‘FARLEYLLC’ नावाचे बनावट ॲप डाऊनलोड करून खाते उघडण्यास सांगितले गेले.

या बनावट ॲपवर मोठा नफा, वाढती रक्कम आणि गुंतवणुकीवर अधिक परतावा (Profit Dashboard) दाखवून फिर्यादी यांना सतत अधिक रक्कम भरण्यास प्रवृत्त करण्यात आले. या खोट्या आकडेवारीला भुलून फिर्यादी यांनी तब्बल ₹१,३०,०२,०००/- विविध खात्यांत जमा केले.

जमा केलेली रक्कम थेट न काढता ती ‘Layering’ पद्धतीने अनेक वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये वळवण्यात आली. काही रक्कम एटीएममधून, काही कॅश डिपॉझिट मशीनद्वारे तर काही मर्चंट ट्रान्झॅक्शनद्वारे काढण्यात आली.

गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून बारामती शहर पोलिसांनी तातडीने कारवाई करत सायबर नेटवर्क आणि डिजिटल पुराव्यांचा सखोल तपास सुरू केला.

पोलिसांनी तांत्रिक तपास करून तातडीने बँकांशी पत्रव्यवहार केला आणि विविध खात्यांवरील अंदाजे ₹४४,००,०००/-गोठवले.

प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या नेतृत्वाखालील विशेष तपास पथकाने (ज्यात सपोउनि संदीप जाधव व अन्य अंमलदारांचा समावेश आहे) दोन संशयित आरोपींना अटक केली आहे.

या आरोपींनी एटीएममधून पैसे काढून मुख्य आरोपींच्या सांगण्यावरून SBI च्या खात्यांमध्ये जमा केल्याची कबुली दिली आहे. आता मुख्य आरोपी आणि यामागील संपूर्ण टेलिग्राम/व्हॉट्सॲपवरील सायबर रॅकेट उघडकीस आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

बारामती पोलिसांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन

मा. पोलीस अधीक्षक (पुणे ग्रामीण) आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

आमिषांना बळी पडू नका: हमखास जास्त परतावा, प्री-आयपीओ अलोकेशन (Pre-IPO), किंवा टॅक्स फ्री विथड्रॉवल सांगणाऱ्या अनोळखी WhatsApp/Telegram लिंक्स, Instagram Reels किंवा Facebook जाहिरातींवर विश्वास ठेवू नका.

अधिकृत प्लॅटफॉर्मचाच वापर करा: केवळ मोबाईलवर नफा दिसतो म्हणून पैसे गुंतवू नका. SEBI नोंदणीकृत संस्था आणि अधिकृत ब्रोकरशिवाय कुठेही गुंतवणूक करू नका.

खासगी माहिती देऊ नका: बँक खाते क्रमांक, OTP, UPI PIN, किंवा स्क्रीन शेअरिंग ॲक्सेस कोणालाही देऊ नका.

कोणतीही सायबर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच एका सेकंदाचाही विलंब न करता त्वरित १९३० (1930) या राष्ट्रीय सायबर हेल्पलाईनवर कॉल करा. फसवणूक होताच तातडीने तक्रार केल्यास पैसे फ्रीज करून ते परत मिळण्याची शक्यता सर्वाधिक असते. सायबर गुन्ह्यात ‘वेळ’ हेच सर्वांत महत्त्वाचे शस्त्र आहे!

श्रीशैल चिवडशेट्टी,

प्रभारी पोलीस निरीक्षक, बारामती शहर पोलीस स्टेशन

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे