Breaking
अपघातअभिव्यक्तीदेश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

अजित पवार अपघात प्रकरण – एफआयआर (FIR) का दाखल होत नाही?  रोहित पवारांचा प्रशासनावर गंभीर प्रश्नांचा भडिमार

0 5 5 5 3 3

​बारामती: राज्याचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या प्रकरणावरून आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि संबंधित दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल व्हावेत, या मागणीसाठी रोहित पवार यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. बारामती पोलीस ठाण्यात तब्बल दोन तास चर्चा करूनही एफआयआर दाखल न झाल्याने रोहित पवार यांनी संताप व्यक्त करत अनेक खळबळजनक आरोप केले आहेत.

रोहित पवार यांची प्रमुख मागणी आणि आरोप

​१. दोषी कंपन्यांवर कारवाईची मागणी: डीजीसीएच्या (DGCA) २४ फेब्रुवारीच्या रिपोर्टनुसार, ‘व्हीएसआर’ (VSR) कंपनीच्या विमानांमध्ये तांत्रिक त्रुटी आणि निष्काळजीपणा आढळला आहे. या त्रुटींमुळेच अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला, हे सिद्ध होत असताना कंपनीवर गुन्हा का दाखल केला जात नाही? असा सवाल त्यांनी केला.

२. दोषी अधिकाऱ्यांचा शोध घ्या: विमान उडवण्यास योग्य आहे की नाही, हे तपासण्याची जबाबदारी डीजीसीएच्या अधिकाऱ्यांची होती. खराब विमानाला परवानगी देणारे अधिकारी कोण? तसेच नियोजन करणाऱ्या ‘आर,ओ’ (RO) कंपनीच्या व्हॉट्सॲप चॅटमध्ये विजिबिलिटीची खोटी माहिती देणारे अधिकारी कोण? त्यांच्यावर एफआयआर का नाही?

३. विमान जाणीवपूर्वक दिले की चुकून?: डीजीसीएने व्हीएसआर कंपनीची पाच विमाने ग्राउंड (बंदी) केली आहेत. मग अजित पवारांच्या प्रवासासाठी तेच ‘फॉल्टी’ विमान का निवडले गेले? हा ‘क्रिमिनल कॉन्स्पिरसी’चा (गुन्हेगारी कट) भाग आहे का, असा संशय त्यांनी व्यक्त केला.

४. झिरो एफआयआरचा अधिकार: नवीन कायद्यानुसार (BNSS 2023), कोणताही नागरिक कुठेही ‘झिरो एफआयआर’ दाखल करू शकतो. मरीन ड्राईव्ह पोलिसांनी तो नाकारला आणि आता बारामती पोलीसही टाळाटाळ करत आहेत, यावरून कायद्याचे उल्लंघन होत असल्याचा दावा त्यांनी केला.

पोलिसांची भूमिका आणि पेच

​रोहित पवार यांच्या मते, पोलीस प्रशासनावर वरून प्रचंड दबाव असल्याचे जाणवते.

​अपघात अहवालाचे (Accident Report) चे कारण देत पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणाचा ‘अपघात अहवाल’ आधीच दाखल आहे आणि सीआयडी (CID) त्याचा तपास करत आहे. त्यामुळे नव्याने एफआयआर घेता येणार नाही.

​पोलिसांनी तांत्रिक तपासाचे कारण दिले असले तरी, रोहित पवार यांचे म्हणणे आहे की, अपघात अहवाल वेगळा आणि गुन्हेगारी कट (Criminal Angle) तपासण्यासाठी एफआयआर वेगळा असणे आवश्यक आहे.

रोहित पवार यांचे ​प्रशासनावर प्रश्नचिन्ह,

“एका मोठ्या नेत्याच्या अपघाताबाबत एफआयआर का टाळला जात आहे?”

​पुण्यात कबुतर चोरीला गेल्यास एफआयआर होतो, मग इतक्या मोठ्या नेत्याच्या अपघाताबाबत प्रशासन इतके हतबल का?

​’व्हीएसआर’ कंपनीच्या मालकांचे सत्तेतील बड्या नेत्यांशी असलेले आर्थिक संबंध आणि मैत्रीमुळेच हा गुन्हा दडपला जात आहे का?

सीआयडी गेल्या २७ दिवसांपासून काय तपास करत आहे आणि प्राथमिक अहवाल अजून का समोर आला नाही?

​रोहित पवार यांनी स्पष्ट केले आहे की, ते याप्रकरणाचा पाठपुरावा सोडणार नाहीत. त्यांनी आज सीआयडी कार्यालयावर जाऊन जाब विचारण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, येत्या काळात संसदेतही हा मुद्दा विविध पक्षांच्या खासदारांमार्फत उपस्थित केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. “आम्हाला राजकारण करायचे नाही, तर फक्त अजित दादांना न्याय मिळवून द्यायचा आहे,” असे सांगत त्यांनी या लढाईत सर्वसामान्य जनतेला सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे