आरोग्य व शिक्षणगुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र
शरीरास घातक इंजेक्शन विकणाऱ्यास बारामती शहरामध्ये अटक, – मेफेनटर्माइन (MEPHENTERMINE) या इंजेक्शनाच्या ९० बॉटल मिळुन आल्या

0
1
7
1
0
3
बारामती: ता. ०३/०६/२०२५ रोजी बारामती शहर पोलीस स्टेशन हद्यीमध्ये पोलीसांकडून पेट्रोलिंग चालू असताना बारामती भिगवण रोड ईलाईट जिम येथे सर्व्हिस रस्त्यावर बाजूला दोन इसम त्यांच्या जवळ असलेल्या क्रेटा गाडी क्रमांक एम एच १४ जे ए ०९०१ मध्ये बसलेले दिसुन आल्याने आम्ही त्यांचे जवळ जावुन त्यांना त्यांचे नाव पत्ता विचारला असता त्यांनी त्याची नावे तन्मय कल्याण बनकर वय २६ वर्ष रा.सहयोग सोसायटी समोर बारामती जि पुणे व दुसऱ्या इसमास त्यांचे नाव पत्ता विचारले असता तो गाडीतुन उतरून पळुन गेला. तन्मय यास त्यांचे नाव विचारले असता त्यांचे नाव राहुल उघाडे (पुर्ण नाव माहित नाही असे सांगितले त्यांचेकडे चौकशी करीत असताना त्यांने उडवा- उडवीची उत्तरे देवू लागला. त्यामुळे आम्ही पोलीस स्टाफने त्याची व त्याच्या ताब्यात असलेल्या चारचाकी क्रेटा गाडीची झडती घेतली असता त्याचे गाडीच्या डिकीत एका खाकी बॉक्स मध्ये
मेफेनटर्माइन (MEPHENTERMINE) या इंजेक्शनाच्या ९० बॉटल मिळुन आल्या
तन्मय कल्याण बनकर वय २६ वर्ष रा.सहयोग सोसायटी समोर बारामती व राहुल उघाडे (पुर्ण नाव माहित नाही याचेवर गुन्हे प्रकटीकरण पथकातील पो कॉ जितेंद्र महादेव शिंदे यांनी बारामती शहर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असुन सदर आरोपी पैकी एका आरोपीस अटक करण्यात आली असुन दुसरा आरोपी राहुल उघाडे हा फरार आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सपोनी भिंताडे हे करीत आहेत.
याबाबत अन्न व औषध विभागाचे औषध निरीक्षक सचिन शिवदास बुगड यांनी बारामती शहर पोलीस स्टेशन येथे भेट देवून सदर इंजेक्शनचा उपयोग हृदयविकाराचे आजारामध्ये केला जातो असे सांगितले. परंतू सध्या या इंजेक्शनचा उपयोग तरुण मुले व्यायाम करुन बॉडी बिल्डींगसाठी व व्यसन म्हणून करत असल्याचे सांगितले आहे.
तसेच या इंजेक्शनमुळे कायमस्वरुपी तंद्री लागणे, ब्लड प्रेशर जास्त राहणे, किडनी निकामी होणे असे दुष्परिणाम होत आहे.