गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र
बारामतीत मध्यरात्री पोलिसांची मोठी कारवाई; अमृता लॉजवर छापा, सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
५ पीडित महिलांची सुटका (पश्चिम बंगाल आणि मुंबईतील महिलांचा समावेश) देहव्यापार चालवणाऱ्या हॉटेल चालकासह दोघांना बेड्या डमी ग्राहक पाठवून बारामती तालुका पोलिसांचा यशस्वी सापळा

0
6
3
0
9
0
बारामती : बारामती-भिगवण रोडवरील वंजारवाडी नजीक असलेल्या ‘अमृता लॉज’वर (सोमनाथ हॉटेल) बारामती तालुका पोलिसांनी मध्यरात्री धडक कारवाई करत एका मोठ्या अवैध वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी हॉटेल चालकासह दोन आरोपींना अटक केली असून, ५ महिलांची सुटका केली आहे.

१४ एप्रिल २०२६ रोजी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास पोलिसांना अमृता लॉजवर अनैतिक देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची अत्यंत खात्रीशीर माहिती मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव आणि उपनिरीक्षक राम हरी भोसले यांच्या पथकाने एक बनावट (डमी) ग्राहक तयार करून थेट लॉजवर पाठवला. नियोजनपूर्वक आखलेल्या या सापळ्यात डमी ग्राहकाने इशारा करताच पंचांसमवेत दबा धरून बसलेल्या पोलिसांनी लॉजवर अचानक छापा टाकला.





