अभिव्यक्तीब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक
बारामती तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या नूतन कार्यकारिणीची निवड संपन्न! पत्रकार संघात नव्या रक्ताला संधी! मोरगाव येथील बैठकीत पार पडल्या निवडी; पहा पूर्ण कार्यकारिणी.
बारामती तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी युवराज खोमणे; कार्याध्यक्षपदी राजेश वाघ यांची निवड

0
6
0
7
4
7
बारामती : बारामती तालुका ग्रामीण पत्रकार संघाची वार्षिक सर्वसाधारण बैठक मोरगाव येथील ‘निसर्ग संगीत पर्यटन केंद्र’ येथे उत्साहात पार पडली. या बैठकीत सन २०२६-२७ या वर्षासाठी नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली असून, अध्यक्षपदी युवराज खोमणे तर कार्याध्यक्षपदी राजेश वाघ यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
शुक्रवार, २७ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५:३० वाजता आयोजित या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार दत्ता माळशिकारे होते. पत्रकार संघाचे ज्येष्ठ विधीज्ञ व कायदेशीर सल्लागार ॲड. गणेश आळंदीकर यांनी नवीन या निवडी जाहीर केल्या.

यामध्ये खालील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या
* उपाध्यक्ष: कल्याण पाचांगणे व सुनील जाधव
* सचिव: गजानन हगवणे
* सहसचिव: चिंतामणी क्षीरसागर
* खजिनदार: विजय गोलांडे
* पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती अध्यक्ष: महेश जगताप
* सल्लागार: माणिकराव दांगडे पाटील, दत्ताजी माळशिकारे व जयराम सुपेकर (आप्पा)





