Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या दोन महिलांना अटक; थेट येरवडा कारागृहात रवानगी

1 0 0 2 9 3

बारामती: वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या हद्दीत बेकायदेशीरपणे हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या दोन महिलांवर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत दोन्ही महिलांना अटक करण्यात आली असून, त्यांची रवानगी थेट पुण्यातील येरवडा कारागृहात करण्यात आली आहे.

कोमल प्रमोद नवले आणि जयश्री प्रकाश नवले (दोन्ही रा. निंबूत, ता. बारामती, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या महिला आरोपींची नावे आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या दोघीही परिसरात हातभट्टीची दारू विक्री करत होत्या. याबाबतची खात्रीलायक माहिती मिळताच पोलिसांनी २६ ऑक्टोबर २०२६ रोजी ही कारवाई केली.
याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर २३१/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम १२३ आणि महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५(ई) अन्वये गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करण्यात आली आहे.

ही कारवाई वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक जीवन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अंमलदार ग्रेड पोलीस उपनिरीक्षक दीपक वारुळे, पोलीस शिपाई निलेश जाधव, नागनाथ परगे, आरती तोडेकर आणि विकास येटाळे यांच्या पथकाने केली. पुणे ग्रामीण पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरातील अवैध दारू विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे