Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

सुपा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना, नारोळी ता.बारामती येथे अज्ञात कारणावरुन एकाचा खून,परप्रांतीय आरोपी फरार,

0 6 4 8 8 7

बारामती : दि.२४.०९.२०२५ रोजी सुपा पोलीस ठाण्यात हरविलेल्या व्यक्ती संदर्भात (ह्यूमन मिसिंग) तक्रार दाखल होती, हि तकार संतोष देवेंद्राप्पा लमान मुळ रा. आद्रहळी ता. शिराटी जि. गदक राज्य कर्नाटक सध्या रा. नारोळी ता. बारामती जि.पुणे, यांना दिलेली होती त्यात त्यांनी त्यांचे मामा गणेश शंकर चव्हाण वय ४९ वर्षे, मुळ रा आद्रहळी ता. शिराटी जि. गदक राज्य कर्नाटक सध्या रा नारोळी ता. बारामती हे दिनांक २२/९/२०२५ रोजी रात्री ९:३० वाचे सुमारास मौजे नारोळी ता. बारामती येथून हरविले आहेत अशी तक्रार दिली होती.

या तक्रारीच्या अनुषंगाने सुपा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक श्री.मनोज नवसारे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार रूपेश दिनानाथ साळुंके हे तपास करत होते 

तपासादरम्यान दिनांक २६.०९.२०२५ रोजी सकाळी ९.४५ वाचे सुमारास हवालदार साळुंखे यांना छाया रमेश महाडिक यांचा फोन आला व त्यांनी सांगीतले की माझा भाऊ अशोक जयवंत हमे याने मला फोन फोन करून सांगितले की आमच्या नारोळी येथिल शेतातील घराच्या कंपाउंडचे काम चालु असलेल्या ठिकाणी मुरूमाचा ढिग आहे व त्यातुन उग्र वास येत आहे व दोन कुत्रे त्यातुन काहीतरी उकरून खात आहेत तरी आपण त्या ठिकाणी जावुन खात्री करा.हवालदार साळुंखे यांनी लागलीच हि बाब वरिष्ठ अधिकारी यांना सांगीतली.पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहचले.त्या ठिकाणची पाहणी केली असता मुरूमाच्या ढिगा-यात एक पुरूष जातीचा मृतदेह दिसुन आला.

पोलीसांनी फॉरेन्सीक टिम बोलावुन घेतली व सदर मृतदेहाची पाहणी केली असता या मयताच्या शरीरावर हरवलेल्या व्यक्तीच्या तक्रारीत वर्णन केलेल्या खुणा आढळून आल्या, तक्रारीत वर्णन करण्यात आलेल्या खुणा व मिळालेला मृतदेह हा एकच आहे याची खात्री पोलिसांना झाली.

पोलिसांना तपासादरम्यान मयत गणेश शंकर चव्हाण व नागेश चंदबसप्पा बुधियाला हे छाया रमेश महाडिक यांच्या शेतावर काम करणारे कामगार एकत्रच रहात असल्याची माहिती मिळाली होती.

हरविलेल्या व्यक्ती संदर्भात तक्रार दाखल करताना संतोष लमान यास गणेश शंकर चव्हाण हा काळूराम बबन देवकु‌ळे याच्या गेला होता असे नागेश चंदवसप्पा बुधियाला यांने सांगीतले होते.

तपास करीत असताना पोलीसांनी काळुराम बबन देवकुळे यांने दिलेल्या जबाबात तो छाया रमेश महाडीक यांच्या शेतावर दि.१७.९.२०२५ पासुन कामावर गेला नाही व गणेश चव्हाण यास भेटला नसल्याचे सांगीतले आहे. यावरून नागेश चंदबसप्पा बुधियाला याने तक्रार  दाखल करताना तक्रारदारास दिशाभुल करणारी माहीती दिली असल्याचे दिसुन येत आहे.

तसेच नागेश चंदबसप्पा बुधियाला हा दि.२३.९.२०२५ पासुन कोणास काहीएक न सांगता फोन बंद करून कामावरून निघुन गेला असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान मयत व नागेश चंदवसच्या बुधियाला रहात असलेल्या खोलीची फॉरेन्सीक टीमसह पाहणी केली असता, त्या खोलीमध्ये रक्त सदृश डाग असलेला चाकु मिळुन आलेला आहे. फॉरेन्सीक टीम यांनी त्यांचेकडील उपलब्ध असलेल्या तांत्रिक गोष्टींचा वापर करून खोलीची सखोल पाहणी केली असता फरशीवर रक्त सदृश डाग मिळुन आलेले आहेत. या खोली पासुन १०० ते १५० फुट अंतरावरील कॅनॉलच्या बाजुला झाडाझुडपा मध्ये मिळून आलेल्या चटई,घोंगडे व ब्लॅकेट यावर देखील रक्त सदृश डाग दिसुन आले आहेत.

यावरून नागेश चंदबसप्पा बुधियाला यानेच मयत गणेश शंकर चव्हाण याचा अज्ञात कारणावरुन कोणत्यातरी हत्याराने (चाकू) खुन करुन व पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यास मुरूमाच्या ढिगा-याखाली पुरून ठेवले होते म्हणुन माझी नागेश चंदबसप्पा बुधियाला रा. कर्नाटक पुर्ण पत्ता माहीत नाही याचे विरूध्द कायदेशीर तकार आहे असे हवालदार रूपेश दिनानाथ साळुंके यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे.

दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर करण्यात आला असून गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री.जिनेश कोळी हे करीत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे