अभिव्यक्तीब्रेकिंगमहाराष्ट्र
वडगांव निंबाळकर येथे महात्मा ज्योतिराव फुले जयंती साध्या पद्धतीने साजरी.

0
6
2
7
6
0
वडगांव निंबाळकर : क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती आज वडगांव निंबाळकर (ता. बारामती) येथे अत्यंत साध्या पद्धतीने आणि वैचारिक वातावरणात साजरी करण्यात आली. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री मा. अजितदादा पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे यंदाचा उत्सव कोणताही गाजावाजा न करता केवळ प्रतिमा पूजनाने संपन्न झाला.

यावेळी उपस्थितांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, जयंती ही केवळ व्यक्तीसापेक्ष नसते, तर ती त्यांच्या विचारांची असते. महात्मा फुले यांनी दिलेला सत्यशोधक विचार आणि शिक्षणाची गंगा जनसामान्यांपर्यंत पोहोचवणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.
ग्रामपंचायत कार्यालयात सकाळी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी स्वर्गीय अजितदादा पवार यांनाही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यंदाचा जयंती उत्सव साधेपणाने साजरा करून एक वेगळा आदर्श समाजासमोर ठेवण्यात आला आहे.





