Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

बारामतीत बेकायदेशीर गावठी कट्टा बाळगणाऱ्या परप्रांतीय आरोपीला अटक; पोलिसांची धडाकेबाज कारवाई

0 8 8 5 0 9

​बारामती: बेकायदेशीररीत्या गावठी कट्टा आणि जिवंत काडतूस बाळगणाऱ्या उत्तर प्रदेशातील एका तरुणाला बारामती तालुका पोलिसांनी जेरबंद केले आहे. ही कारवाई ७ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास बारामती-भिगवण रोडवरील वंजारवाडी हद्दीतील हॉटेल जगदंबा नजीक करण्यात आली.

​सत्यदेव भीमसेन वर्मा (सध्या रा. ऐश्वर्या बेकरीजवळ, सूर्यनगरी, बारामती, मूळ रा. हत्याबाद, ता. जि. आग्रा, उत्तर प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, बारामती तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार आणि गुन्हे शोध पथकाचे अधिकारी कर्तव्यावर असताना पोलीस हवालदार उगले यांना एका गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली. एक व्यक्ती कमरेला गावठी पिस्तूल लावून हॉटेल जगदंबा जवळ उभा असल्याची टीप त्यांना मिळाली होती. या माहितीची खात्री पटताच, पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी लागलीच दोन पंचांना बोलावून पोलीस स्टाफसह सदर ठिकाणी छापा टाकला.

​पोलिसांनी संशयित आरोपी सत्यदेव वर्मा याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे एक गावठी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस आढळून आले. पोलिसांनी हे शस्त्र पंचांसमक्ष जप्त करून आरोपीला अटक केली. याप्रकरणी पोलीस हवालदार महेश अंकुश उगले यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम ३, २५ व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी नारायण पवार, पोलीस उपनिरीक्षक कल्याण शिंगाडे, सहाय्यक फौजदार सुरेंद्र वाघ, पोलीस हवालदार अभिजीत एकशिंगे, महेश उगले, जितेंद्र शिंदे, निलेश वाकळे आणि चालक विठ्ठल तरंगे यांच्या पथकाने केली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीरंग शिंदे करत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे