ब्रेकिंगमहाराष्ट्र
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या (official unit flag) घटक झेंड्याला मान्यता.

0
7
9
4
1
3
पुणे : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाची स्थापना झाल्यानंतर तब्बल सात वर्षानंतर पोलीस आयुक्तालयाला स्वतंत्र घटक झेंडा (official unit flag) मंजूर झाला आहे. पिंपरी चिंचवड चे पोलीस आयुक्त श्री.विनयकुमार चौबे(भा.पो.से.)यांच्या पाठपुराव्यामुळे दिनांक १० नोव्हेंबर २०२५ रोजी पोलीस महासंचालक कार्यालयाने या घटक झेंड्याला (official unit flag) ला मान्यता दिली आहे.हा झेंडा पिंपरी चिंचवड पोलिसांची कर्तव्यनिष्ठा, शिस्त, वेग, धैर्य आणि सेवाभाव यांचे प्रतीक आहे.

महाराष्ट्र पोलीस दलातील विविध जिल्हे व आयुक्तालयाच्या पोलीस दलांना घटक झेंडे पोलीस महासंचालक कार्यालयाकडून मान्यता देवून प्राधिकृत करण्यात आलेले आहेत. हे घटक झेंडे हे महाराष्ट्र पोलीस कर्तव्य मेळावा व इतर राज्यस्तरीय पोलीस स्पर्धामध्ये सहभागी होताना उपयोगात आणले जातात.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाची स्थापना १५ ऑगस्ट २०१८ रोजी झालेली आहे. मात्र,अद्यापपर्यंत आयुक्तालयाला घटक झेंडा उपलब्ध झाला नव्हता.
IPS,MR. VINAY KUMAR CHOUBEY, commissioner,Pimpri Chinchwad
ही बाब लक्षात घेवून पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे घटक झेंड्याचे रेखाचित्र तयार करुन तसेच याबाबत प्रस्ताव सादर केला होता. व त्याच्या मंजुरीसाठी राज्याचे पोलीस महासंचालक यांना अहवाल सादर केला होता. त्यास पोलीस महासंचालक कार्यालया कडून मान्यता दिली गेली आहे व आता पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचा घटक झेंडा (official unit flag) अधिकृतपणे मंजूर झाला आहे.

झेंड्याबद्दल माहितीः हा घटक झेंडा पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाला अधिकृत मान्यता मिळवून देतो आणि महाराष्ट्रातील इतर पोलीस घटकांप्रमाणे कर्तव्य मेळावा आणि राज्यस्तरीय पोलीस स्पर्धांमध्ये वापरला जाईल.
झेंड्याची निर्मितीः झेंड्याचे रेखाचित्र तयार करून महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता.
झेंड्याचे प्रतीकः हा झेंडा औद्योगिक आणि आयटी राजधानीच्या रक्षक आहे याचे प्रतीक आहे, जो पिंपरी चिंचवड पोलिसांची कर्तव्यनिष्ठा, शिस्त, धैर्य आणि सेवाभाव दर्शवतो.
हा घटक झेंडा (official unit flag) महाराष्ट्र पोलीस कर्तव्य मेळावा आणि इतर राज्यस्तरीय पोलीस स्पर्धांमध्ये वापरले जातात.






