Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

बारामती गोळीबार प्रकरणाचा उलगडा! दोन लाखांची सुपारी देऊन घडवून आणला राणा सूर्यवंशींवर हल्ला; मुख्य सूत्रधारासह दोघांना अटक, एका अल्पवयीनाला घेतले ताब्यात

0 9 8 7 6 2

बारामती: बारामतीत पालखी महामार्गावर राणा सूर्यवंशी यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचा छडा लावण्यात पोलिसांना अवघ्या दोन दिवसांत मोठे यश आले आहे. या प्रकरणातील धक्कादायक माहिती समोर आली असून, चक्क दोन लाख रुपयांची सुपारी देऊन हा गोळीबार घडवून आणल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पुणे शहर आणि ग्रामीण पोलिसांनी वेगाने कारवाई करत एका अल्पवयीन मुलासह हल्लेखोर आणि मुख्य सूत्रधाराच्या मुसक्या आवळल्या आहेत.

 

 

रविवारी (दि. 18 ऑक्टोबर) सायंकाळी पायलट ढाब्यासोर राणा दिलीप सूर्यवंशी यांच्यावर दोन अज्ञात तरुणांनी सशस्त्र हल्ला करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. या थरारक घटनेनंतर बारामती तालुका पोलीस ठाण्यात लक्ष्मीकांत सूर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासाची चक्रे वेगाने फिरवत पुणे शहर पोलिसांनी सुरुवातीला एका विधी संघर्षग्रस्त बालकासह (अल्पवयीन) पार्थ वासुदेव अवथळे (वय 19, मूळ रा. पिंपरी गवरी, ता. खामगाव, जि. बुलढाणा, सध्या रा. कर्वेनगर, दत्तगंदिर कॅनल रोड स्पेंन्सर चौक, पुणे) याला पकडून पुणे ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात दिले.

बारामती पोलिसांनी या आरोपींची कसून चौकशी केली असता एक खळबळजनक सत्य उघडकीस आले. या तरुणांनी हा हल्ला पैशांच्या आमिषापोटी केल्याचे कबूल केले. ज्ञानदेव महादेव शिंदे (वय 50, व्यवसाय – चालक व मॅनेजमेंट, मूळ रा. वीट, ता. करमाळा, जि. सोलापूर, सध्या रा. साई लिला बिल्डींग, थोरातनगर, भिगवण, ता. इंदापूर) याने या गुन्ह्यासाठी त्यांना तब्बल दोन लाख रुपये दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने तांत्रिक विश्लेषण करून पोलिसांनी तात्काळ पावले उचलत आरोपी पार्थ अवथळे आणि मुख्य सूत्रधार ज्ञानदेव शिंदे यांना मंगळवारी (दि. 20 ऑक्टोबर) रोजी अटक केली. या दोघांनाही न्यायालयात हजर केले असता, मा. न्यायालयाने त्यांना 23 ऑक्टोबर 2026 पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर केली आहे.

सुपारी देऊन खून करण्याचा प्रयत्न झाल्याचे उघड झाल्याने बारामती तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. सदर गुन्ह्याचा मुख्य हेतू काय होता आणि यात इतर आणखी कोणाचा सहभाग आहे का? याबाबतचा पुढील अधिक तपास बारामती तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार हे करीत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे