गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र
चार वेळा बलात्कार,छळ,फलटण शहरात महिला डॉक्टरची आत्महत्या.

0
3
0
0
6
2
बारामती : सातारा जिल्ह्यातील फलटण शहरात उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका वरिष्ठ महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री उघडकीस आली आहे.
महिला डॉक्टरने बलात्कार आणि छळाचा आरोप करत आत्महत्या केली असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर मागील काही दिवसांपासून पोलीस आणि आरोग्य विभागाच्या एका प्रकरणामध्ये अडकली होती दरम्यान चौकशी सुरु असताना महिला डॉक्टर मानसिक तणावाखाली होती,
चौकशी संदर्भात महिला डॉक्टरने यापूर्वीच आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करून ‘माझ्यावर अन्याय होत आहे, मी आत्महत्या करीन’ असा स्पष्ट इशारा दिला होता.
मात्र,या गंभीर इशाऱ्यावर कोणतीही लक्ष दिले नाही. वरिष्ठांकडे तक्रार करूनही दाद मिळत नसल्याने अखेर त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.
शहरातील एका नामांकित हॉटेलमध्ये हि घटना घडली आहे,पोलिसांनी रात्री घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला व प्राथमिक तपासानुसार हि आत्महत्या असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मात्र आज महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाला धक्कादायक वळण लागले आहे.
मृत्यूपूर्वी महिला डॉक्टरने आपल्या तळहातावर आत्महत्येचे कारण स्पष्टपणे लिहील्याचे समोर आले आहे. तिने एका पीएसआय गोपाळ बदने यांचे नाव लिहले आहे ज्याने तिच्यावर चार वेळा बलात्कार केल्याचा आरोप केला आणि दुसरा एक व्यक्ती प्रशांत बनकर यांनेही तिला मानसिक व शारीरिक त्रास दिल्याचा आरोप केला.

“माझ्या मरण्याचे कारण PSI गोपाल आहे. त्याने माझा चार वेळा बलात्कार केला आणि प्रशांत बनकर यांनी मला चार महिने शारीरिक आणि मानसिक त्रास दिला” असे या महिला डॉक्टरच्या हातावर लिहिल्याचे समोर आले आहे.
दरम्यान तुषार जोशी, पोलीस अधीक्षक सातारा यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे व याचा खोलवर तपास देखील करणार आहोत,अशी माहिती दिली.





