गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र
पतीच्या त्रासाला कंटाळुन विवाहितेची आत्महत्या, वडगांव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

0
1
6
4
3
2
बारामती : दुसऱ्या महिलेसोबत इन्स्टाग्राम व व्हॉटसॲप चॅटींग केल्याबाबत जाब विचारला असता व त्याबाबत विचारणा केली व समजुन सांगण्याचा प्रयत्न केला म्हणून शारिरीक व मानसिक त्रास देवून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याची घटना मासाळवाडी ता. बारामती येथे समोर आली आहे.
वडगाव निंबाळकर पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रितम रामचंद्र जाधव रा.शिरढोण ता कोरेगाव जि.सातारा यांनी आपली बहिण श्रेया शिवाजी देडे वय 22 वर्षे, (लग्नापुर्वीचे नाव श्रेया रामचंद्र जाधव) सध्या रा. मासाळवाडी ता. बारामती जि. पुणे हिस शिवाजी माणीक देडे रा.मासाळवाडी ता. बारामती जि.पुणे याने वेळोवेळी शारीरिक व मानसिक त्रास दिला व माझ्या बहिणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
याबाबत सविस्तर हकिकत अशी कि दिनांक 21/05/2025 पूर्वी मागील दोन महिन्यापासून शिवाजी माणीक देडे हा आपली पत्नी श्रेया शिवाजी देडे हिला मी दुसऱ्या महिलेसोबत लग्न केले आहे असे सांगून व एकदा त्या महिलेला घरी घेऊन आला होता तसेच तिच्याशी नेहमी फोनवर चॅटिंग करत होता,याचाच नेहमी जाब विचारत असल्याने शिवाजी माणीक देडे याने आपली पत्नी श्रेया हिला वेळोवेळी शारीरिक व मानसिक त्रास दिला व त्याच विवंचनेतून पती शिवाजी माणीक देडे याच्या त्रासाला कंटाळुन दिनांक 24/05/2025 रोजी दुपारी 04:56 वा.चे पुर्वी नक्की वेळ माहिती नाही तीने तिच्या राहत्या घरी घराच्या लोखंडी ॲगलला साडीने गळफास घेवुन आत्महत्या केली आहे.
घडल्या प्रकारावरून फिर्यादी प्रितम रामचंद्र जाधव यांनी वडगांव निंबाळकर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
दिलेल्या तक्रारीवरून वडगांव निंबाळकर पोलीसांनी भारतीय न्याय संहिता कलम 108,85,82(1),अ.जा.ज.प्रतिं.का.कलम 3(2)(V) नुसार गुन्हा दाखल केला असुन गुन्ह्याचा वर्दी रिपोर्ट मा.JMFC कोर्ट बारामती यांचे कोर्टात रवाना करण्यात आला असुन पुढील तपास मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुदर्शन राठोड बारामती विभाग,बारामती हे करीत आहेत.