
बारामती: आबा विलास जाधव पोलीस कॉन्स्टेबल, नेमणुक वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे यांनी दिलेल्या कायदेशीर फिर्यादीनुसार दिनांक 25/05/2025 रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास निरा बारामती रस्त्यावर वडगाव निंबाळकर येथील पेट्रोल पंपाजवळ एक इसम स्वतः जवळ असणारी विनापरवाना बेकायदा लोखंडी तलावर बाळगुन लोकामध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व चौकशी केली असता दिपक जयसिंग मदने वय 30 वर्षे रा. माळवाडी लाटे ता.बारामती जि.पुणे हा इसम वरील प्रकार करताना आढळला.
अधिक माहिती घेतली असता सदर इसमाजवळ एक 18 इंच लांबीची व 1.4 इंच रूंदीची एका बाजुस धार व टोकाकडे निमुळती होत जाणारी 6.5 इंच लांबीची लाकडी मुठ असलेली लोखंडी तलवार मिळून आली.

सदर इसमाविरूध्द आर्म ॲक्ट कलम 4,(25) प्रमाणे कायदेशीर फिर्याद देण्यात आली आहे.
फिर्यादी वरून गुन्हा दाखल करण्यात आला असुन गुन्ह्याचा वर्दी रिपोर्ट मा.JMFC कोर्ट बारामती यांचे कोर्टात रवाना करण्यात आला असुन वडगांव निंबाळकर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सचिन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हवा पोपट नाळे पुढिल तपास करीत आहेत.


बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा