
बारामती : तु मला सोडचिठ्ठी का देत नाहीस म्हणत पतीचा पत्नीवर तलावरीने हल्ला केल्याची घटना दिनांक 25/05/2025 रोजी सकाळी 11/00 वाजण्याच्या सुमारास वडगाव निंबाळकर,खोमणेवस्ती येथे घडली आहे.

सौ.मोहनी दिपक मदने वय 25 वर्षे रा. बजरंगवाडी लाटे ता बारामती जि.पुणे सध्या रा. वडगाव निंबाळकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दिपक जयसिंग मदने (पती),गणेश जाधव आणि निगडे पुर्ण नाव माहित नाही सर्व रा. बजरंगवाडी लाटे ता. बारामती जि.पुणे यांनी मोहिनी यांच्या वडिलांच्या राहत्या घरी वडगाव निंबाळकर येथील खोमणे वस्ती येथे येऊन तु मला सोडचिठ्ठी का देत नाही असे मोहिनी हिला बोलून तसेच शिवीगाळ व दमदाटी करत शर्टात लपवुन आणलेल्या तलवारीने मोहिनी हिच्या डाव्या हातावर मारून दुखापत केली तर गणेश जाधव याने मोहिनी हिच्या वडीलांना हातातील काठीने पाठीवर मारहाण केली. तसेच निगडे (पूर्ण नाव माहित नाही)याने मोहिनी हिची बहिण गौरी हिस शिविगाळ व दमदाटी करून हाताने मारहाण केली. गणेश जाधव याने वडिलांना ढकलुन देवुन बघुन घेतो अशी धमकी दिली.

दिलेल्या तक्रारीवरून वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात
भारतीय न्याय संहिता कलम 118(1),115,352,351(2)351(3),3(5)आर्म ॲक्ट 4(25) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सचिन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हवा.महेश पन्हाळे हे पुढिल तपास करीत आहेत.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा