ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक
रूई येथे भव्य मोतीबिंदू शस्त्रक्रिया व नेत्र तपासणी शिबिर संपन्न. श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त शिबिराचे आयोजन
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने रुई येथे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व नेत्र तपासणी शिबिर भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा महामंत्री आकाश कांबळे व मित्र परिवाराच्यावतीने संपन्न

0
1
4
5
6
9
बारामती:कळस,रुई ता.इंदापुर येथे दर शुक्रवारी भरवण्यात येणाऱ्या जनता दरबारामध्ये श्री.आकाश कांबळे यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये पुण्यातील सुप्रसिद्ध एच. व्ही.देसाई, नेत्र रुग्णालय, महंमदवाडी, हडपसर पुणे या हॉस्पिटलचे मोफत नेत्र तपासणी, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व गरजू व्यक्तींना अल्प दरात चष्मे वाटप शिबिर आयोजित करण्यात आले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन रूई गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते पार पडले. शिबिरामध्ये नेत्र तपासणी करता १२५ लोकांनी नोंदणी केली असून मोतीबिंदू शिबिरामध्ये २५ लोकांचे ऑपरेशन करण्याचे ठरलेले असल्याचे देसाई नेत्र रुग्णालयाचे अजित थोरात व नेत्रचिकित्सक रेश्मा घोडके यांनी सांगितले.