कोऱ्हाळे: ता.बारामती येथे बुधवार दिनांक १६/१०/२०२४ रोजी भारतीय पत्रकार संघ बारामती तालुका कार्यकारिणीची मासिक बैठक संपन्न झाली.
बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आल्या, पण खास करून संघाच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबविण्याबाबत विशेष करून चर्चा करण्यात आली. संघाच्या बैठकीसाठी सदस्य व पदाधिकारी यांच्या उपस्थिती बाबत प्रश्न निर्माण झालेले निदर्शनास आले व भविष्यात बैठकीसाठी उपस्थित न राहणाऱ्या सदस्य व पदाधिकारी यांच्यावर काय निर्णय घेता येईल यावरही वरिष्ठांच्या मार्गदर्शनातून चर्चा करण्यात आली.
भारतीय पत्रकार संघ हा भारतातील २२ राज्यांमध्ये सुमारे दीड लाख पत्रकारांच्या माध्यमातून कार्यरत आहे,संघाची देशपातळी वरील गरिमा लक्षात घेता प्रत्येक सदस्य व पदाधिकारी यांनी संघातील आपली नैतिक जबाबदारी व कर्तव्य अबाधित राहावे यानुसार कार्य अपेक्षित आहे या संघाच्या शिकवणीनुसार प्रत्येक सदस्य व पदाधिकाऱ्याने आपली भूमिका राखायला हवी असे चर्चेदरम्यान बोलण्यात आले.

को-हाळे बुद्रुक येथे संघाचे माजी सचिव श्री. सोमनाथ लोणकर यांच्या कार्यालयात बारामती तालुका अध्यक्ष श्री.विनोद गोलांडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी भारतीय पत्रकार संघाचे सचिव श्री.सुशीलकुमार अडागळे, संघ संघटक महंमद शेख, यांच्यासह संघाचे सदस्य श्री.सोमनाथ लोणकर, श्री.अजय पिसाळ, श्री.सोमनाथ जाधव, शौकतभाई शेख हे उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा