अभिव्यक्तीब्रेकिंगमहाराष्ट्रसकारात्मक बातमीसामाजिक
वडगाव निंबाळकरचे विद्यमान सरपंच श्री.सुनील दत्तात्रय ढोले यांना, डॉ.बाबासाहेब आंबेडकर भारत भूषण नॅशनल एक्सलन्स “सरपंच पुरस्कार २०२५” प्रदान.

0
1
4
5
6
9
बारामती : डॉ.बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन नवी दिल्ली व झेनिथ टीम इंडिया यांच्यामार्फत दिला जाणारा “भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर भारत भूषण नॅशनल एक्सलन्स सरपंच पुरस्कार २०२५”हा वडगांव निंबाळकर चे विद्यमान सरपंच श्री.सुनील दत्तात्रय ढोले यांना प्रदान करण्यात आला.
महाराष्ट्र सदन नवी दिल्ली येथे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले नेशनल वीमेन’एस एक्सीलेंस अवार्ड केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले व माजी गव्हर्नर कमला ताई गवई तसेच, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया राहाटकर यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला.
जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या या सन्मान सोहळ्याचे उद्घाटन राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया राहाटकर यांच्या हस्ते करण्यात आले.
“गावाच्या विकासाचा ध्यास व वसा हाती घेऊन कर्तव्यदक्षता सामाजिक बांधिलकी या जाणीवेतून एकसंघ पद्धतीने काम करून विकास साध्य करणे व त्याचबरोबर उत्कृष्टता मिळणे हेच खरे भूषण”
या पुरस्काराच्या माध्यमातून वडगांव निंबाळकर गावचे नाव दिल्ली दरबारी दाखल झाले ही वडगांवकरांसाठी कौतुकाची व अभिमानाची बाब आहे.गावाच्या सन्मानासह या कार्यकर्तृत्वासाठी सरपंच श्री.ढोले यांचे गावातील ग्रामस्थांच्या वतीने भरभरून शुभेच्छा देऊन अभिनंदन करण्यात आले.
“मी मागील दोन दशके गावाचा विकाससाठी प्रयत्नशील आहे,गावाचा विकास व्हावा व आपले गांव उत्कृष्ट गांव म्हणून ओळखले जावे हाच माझा नेहमी प्रयत्न आहे व राहील.”
“पुरस्कार सन्मान मिळवून देतात पण,मिळालेल्या पुरस्काराने माझी आणखी जबाबदारी वाढली आहे.”