
बारामती: रूई बाबीर येथील हर घर पेयजल योजना खूप दिवसापासून प्रलंबित होती जानेवारी २०२५ मध्ये पत्र व्यवहार करून देखील अद्याप पर्यंत प्रशासनाने कोणतीही कारवाई न केल्यामुळे आज बारामती याठिकाणी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांना पुणे जिल्हा महामंत्री आकाश कांबळे यांनी रुई येथील हर घर जल योजना बऱ्याच दिवसापासून काम बंद असल्याचे सांगितले. यावरती लगेच तात्काळ प्रांत अधिकारी वैभव नावडकर साहेबांना बोलवून ती योजना तात्काळ चालू करण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे ही पाइपलाइन ज्यांनी कोणी अडवली असेल त्यांचा वरती कारवाई करण्यात यावी असे बावनकुळे यांनी सांगितले. या संदर्भात इंदापूर तहसील कार्यालयाच्या समोर रुई ग्रामस्थांच्या वतीने एक दिवसीय आंदोलन करण्यात आलेले होते.

या आंदोलनाला इंदापूर तालुक्याचे तहसीलदार जीवन बनसोडे साहेब यांनी भेट देवून संबंधित प्रश्नांना न्याय देण्यासाठी वालचंदनगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना पोलीस बंदोबस्तामध्ये पिण्याच्या पाण्याची पाईपलाईनचे काम दि. १४/०५/२०२५ सकाळी ११ वाजता त्वरित चालू करण्याची कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.

यावेळी आबासाहेब थोरात, जनार्दन पंढरमिसे, यशवंत कचरे, तानाजी मारकड, अनिल कांबळे, प्रविणकुमार शहा, अविनाश मोहिते, सतिश झेंडे, भाजपा पुणे जिल्हा अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयूर कांबळे, ॲड किशोर अडसूळ, बंडु डोंबाळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते,



बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा