गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र
पुण्यातील स्वारगेट एसटी स्टॅडवर धक्कादायक बलात्कार प्रकरण

0
1
4
5
6
9
बारामती : स्वारगेट एसटी स्टँड परिसरात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाला आहे. ही घटना मंगळवारी पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास घडली. पीडित तरुणी पुण्यातून फलटणच्या दिशेने प्रवासासाठी थांबलेली होती. फलटणला जाणारी बस या ठिकाणी न लागता दुसऱ्या ठिकाणी लागली आहे असे आरोपीने तरुणीला सांगितले व तिला गुमराह केले आणि तिला स्थानकातील सुनसान बसमध्ये घेऊन गेला,तिला विश्वासात घेऊन दुसऱ्या बस मध्ये चढवले व त्यानंतर त्याने तिच्यावर जबरदस्ती केली आणि तिथून फरार झाला आहे.
पोलिसांनी आरोपीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटली आहे. या घटनेमुळे एसटी स्थानक परिसरातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.