
बारामती : होळ आठ फाटा येथील जिल्हा परिषद शाळा इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर सभागृहाचे बांधकाम सुरू आहे. यावर आक्षेप घेण्यात आला आहे. याबाबत चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे.
होळ आठफाटा जिल्हा परिषद शाळेत पहिली ते चौथी वर्गामधील एकूण ४३ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेला स्लॅब मधील एकूण पाच वर्गखोल्या आहेत. शेजारी दुमजली ग्रामसचिवालयाची प्रशस्त इमारत आहे. शाळेच्या वरच्या बाजूला विद्यार्थ्यांसाठी सभागृह बांधकाम सुरू आहे. शाळेच्या खालच्या बाजूला असलेल्या इमारतीची योग्यता न तपासता दुसऱ्या मजल्यावरील सभागृहाचे बांधकाम सुरू केले विद्यार्थ्यांना सभागृहाची आवश्यकता आहे का? याबाबतची चर्चा ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत न घेता काम सुरू केल्यामुळे कामाची चौकशी व्हावी याबाबत ग्रामपंचायत सदस्य दिपक वाघ यांनी विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडे तक्रार दाखल केली.

कामाच्या माहिती बाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे माहिती मागितली असता विसंगत माहिती देण्यात आली. यामुळे शिक्षण विभागाकडे कामाच्या माहितीचा पाठपुरावा केल्यानंतर जुन्या इमारतीचा (स्ट्रक्चरल ऑडिट )योग्यता दर्जा तपासला आहे का याची कोणतीही माहिती शिक्षण विभागाकडे मिळून आली नाही. शिक्षण विभागाच्या परवानगीशिवाय काम सुरू असल्याची बाब लक्षात आली.

होळ आठफाटा ता. बारामती येथे जिल्हा परिषद शाळा इमारतीच्या वरच्या मजल्यावर सभागृहाचे बांधकाम अंतिम टप्प्यात
यामुळे संबंधित कामाचा दर्जा आणि आवश्यकता होती का? याबाबत चौकशी व्हावी. विकास कामावर माझा आक्षेप नाही परंतु आवश्यकता नसेल त्या ठिकाणी निधी टाकून खर्च केला जात असल्याची आमची तक्रार आहे असे ग्रामपंचायत सदस्य दिपक वाघ यांनी सांगितले.

शासनाकडुन वरच्या इमारतीसाठी सुमारे पन्नास लाख रूपये २५/१५ मधुन मिळाले काम अंतीम टप्यात आहे. सदर इमारत (स्ट्रक्चरल ऑडिट) योग्यता दर्जा तपासला आहे.अशी माहिती
सार्वजनिक बांधकाम विभाग बारामती उप अभियंता रामसेवक मुकेकर यांनी दिली.
शाळेची इमारत सभागृहाचे बांधकाम होण्यासाठी सक्षम आहे का याबाबत स्ट्रक्चरल ऑडिट तयार करून अहवाल सादर करावा तोपर्यंत काम बंद ठेवण्यात यावे असे आदेश शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आले आहेत.
गटशिक्षणाधिकारी, श्री.निलेश गवळी
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा