अभिव्यक्तीआरोग्य व शिक्षणनोकरीब्रेकिंगमहाराष्ट्रसकारात्मक बातमी
करंजेपूल सोमेश्वरनगर येथे एकत्र अभ्यास करणारे आठजण पोलिस,- अभ्यासाच्या टेबलावर लिहिलं एकच वाक्य आयसाठी भरती व्हायचं ! कष्टकरी आईबापाची लेकरं खाकी वर्दीत

0
1
6
4
3
2
बारामती : सोमेश्वरनगर येथे वेगवेगळ्या गावातून आलेल्या कष्टकरी मजूर कुटुंबातील तब्बल आठ जणांनी एकाच वेळी एकत्रित येत व एकत्रित अभ्यास व सराव करीत खाकी वर्दी मिळवली, प्रत्येकाचे गाव वेगळे असले तरी प्रत्येकाचे ध्येय एकच होते
“पोलिसात भरती व्हायचंय”
अनेक ठिकाणी अपयश आलं.अखेर पोलिस भरतीची तयारी सुरू केली तेव्हा टेबलवर एकच वाक्य लिहिलं…
‘आयसाठी पोलिस भरती व्हायचं…!’
आळस किंवा कंटाळा आला की ते वाक्य वाचायचो आणि रात्री एक-दोन वाजेपर्यत जागायची प्रेरणा मिळायची. आणि त्याच वाक्याने पोलिस भरती झालो” अशी भावना शैलेश तरडे याने व्यक्त केली.
अक्षय कदम या यशवंतानेही ‘ अपयश येतं तेव्हा आईवडिलांशिवाय आपलं कुणी नसतं’ या शब्दात आपल्या भावना मांडल्या.
करंजेपूल ता.बारामती येथे विवेकानंद अभ्यासिकेत पोलिस भरती होण्यासाठी विविध गावांतून आलेल्या कष्टकरी कुटुंबातील तब्बल आठ जणांची एकाच वेळी पुणे पोलिस कारागृह शिपाईपदी निवड झाली आहे.
२०२४ च्या पुणे कारागृह पोलिस भरतीत
मोनेश हाके (खंडोबाचीवाडी ता. बारामती) याने १३५, विजय धायगुडे (मासाळवस्ती ता. बारामती) १३५,
शैलेश तरडे (सासवड ता. पुरंदर) याने १३४,
अक्षय कदम (मुरूम ता. बारामती) याने १३३,
राहुल पवार (कोऱ्हाळे ता. बारामती) याने १३३,
अभिषेक गार्डी (वडगाव निंबाळकर) याने १३३,
सीमा कर्चे (नातेपुते जि. सोलापूर) हिने १२९
तर रेश्मा काळे (करमाळा जि. सोलापूर) हिने १२४ गुण मिळवत पात्रता यादीत स्थान मिळविले आहे.