गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र
चारित्र्याचा संशयावरून पत्नीवर वार, -पत्नीचा उपचारा दरम्यान मृत्यू , बारामती शहर पोलिसांत गुन्हा दाखल

0
5
9
3
8
7
बारामती : बांदलवाडी ता. बारामती जि. पुणे येथे एका महिलेवर चारित्र्याचा संशय घेवुन धारधार शस्त्राने डोक्यात कपाळावर चेह-यावर वार करून ठार मारण्याच्या उद्देशाने गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे.
लहु रामा वायकर रा बांदलवाडी ता बारामती याने आपली पत्नी सौ.संजना लहु वायकर वय 40 वर्षे हिचे वर चारित्र्याचा संशय घेवुन व त्या कारणावरुन तीच्यावर धारधार शस्त्राने डोक्यात,कपाळावर,चेह-यावर वार करून तीला जीवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला करुन गंभीर जखमी केले होते, दरम्यान जखमी संजना वायकर यांचा ससून रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यु झाल्याने मयत संजना यांचे भाऊ भगवान हनुमंत बिस्दवडे यांनी बारामती शहर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली.

दिलेल्या तक्रारीवरून बारामती शहर पोलिसांनी रामा वायकर याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून १०३ भारतीय न्याय संहिता प्रमाणे कलम वाढ करण्यात आली आहे.
बारामती पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक,विलास नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अंमलदार पोलिस उपनिरीक्षक अशोक राऊत करत आहेत.







